Friday, December 6, 2019

मनो-Money: भाग ११: आहे स्मार्ट तरिही ... - डॉ. रुपाली कुलकर्णी




संध्याकाळी शाळेनंतर घरी पोहोचताच, थालीपीठाचा खमंग वास राधाच्या नाक शिरला. चक्क बाबांना  स्वयंपाकघरात थालीपीठ करताना  पाहून राधा चित्कारली , "अरे वा , बाबा तूम्ही  ? भारीच झालेले दिसते थालीपीठ ! मला वाटले होते आज आई नाही तर आजचे जेवण मॅगीचे नाहीतर स्वीगीचे !!" यावर बाबांनी तिला हसून दाद दिली. नंतर थालीपिठावर ताव मारता मारता दोघांच्या गप्पा सुरु झाल्या.

बाबा : म्हणजे राधाबाई , तुम्हीसुद्धा आईच्या मोबाइलवरून उबर इट्स, स्वीगी वापरता वाटते ?

राधा : हो बाबा ! त्यात काय मोठेसे !! कधी कधी आईला ऑफिसमधून यायला उशीर झाला, की तिलाही हे असे जेवण मागविणे खूप सोयीचे ठरते आणि शिवाय ती  आपल्या मावशींच्याच घरगुती मेस वरून मागविते तेव्हा ते असतेही रुचकर !! मी आईला हे वापरताना  पहिले आहे तेव्हा आता मलाही ते जमायला लागले आहे .

बाबा :  अरे वा ! अडचणीच्या वेळेस टेकनॉलॉजीचा वापर करता आला आणि त्यात आपली सोय झाली, तर त्यात वावगे काहीच नाही !! फक्त स्मार्टफोन हा स्मार्टपणे वापरताही यायला हवा बरका !

राधा : म्हणजे काय हो बाबा ? मी तर चुटकीसरशी आईचे हे काम करू शकते . मग झाले की नाही मी स्मार्ट ?

बाबा : अग हो हो ...थांब जरा. तू सायबर फ्रॉडस विषयी ऐकले आहेस का कधी ?

राधा : आता हे हो काय नवीन बाबा ?

बाबा : अग, इंटरनेट चा वापर करून, वेबसाईट किंवा मोबाईलवरील अँप्लिकेशन मधून  ऑनलाईन पेमेंट्स करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे.टेकनॉलॉजीचा वापर करून त्याद्वारे वेळ वाचविता येतो. पण आपल्या बँक अकॉउंटची माहिती, जर आपण आवश्यक ती  काळजी न घेताच  अशी इंटरनेटच्या माहितीजालावर पसरविली तर तिचा गैरवापर होऊ शकतो आणि  आपल्या बँक अकॉउंटमधून कोणी परस्पर काही आर्थिक व्यवहार करू शकते. अशा इंटरनेटवरून होणाऱ्या गैर व्यवहारांना म्हणतात  सायबर फ्रॉड!  यात  आपले लहान/ मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

राधा: बापरे , आपलाच पैसा असा इतर कोणी वापरणे हे तर भयानकच आहे. ! मग हे  मोबाईलवरील अँप्लिकेशनवरून पैशाचे व्यवहार करूच नयेत का ?

बाबा : असे अजिबात नाहीय ! फक्त आपल्या माहितीचा वापर इंटरनेटवर करतांना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

राधा: म्हणजे आम्ही मुलांनी काय करायचे तितके सांगा ना ..

बाबा :  हे बघ, ऑनलाईन पेमेंट करताना, बँके अकाउंटशी निगडीत असणाऱ्या मोबाइलनंबरवर हे पेमेंट तुम्हीच करत आहात ना हे तपासण्यासाठी "वन टाइम पासवर्ड " चा मेसेज होतो. हा पासवर्ड तुम्ही पेमेंट करण्याआधी कोणालाही द्यायचा नसतो किंवा शेअर करायचा नसतो हे माहित असायला हवे. शिवाय कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर इंटरनेट सुरु असताना आपण "फ्री वायफाय" चा वापर कधीच करू नये. असे फ्री मिळणारे नेटवर्क कितपत सुरक्षित आहे याची आपल्याला खात्री नसते. अशा असुरक्षित असणाऱ्या नेटवर्कवरून, आपल्या डिव्हाईस वरच्या फाईल्समधील माहितीवर  इतर कोणाचीही नजर असू शकते हे लक्षात घ्यायला हवे. म्ह्णूनच   बँके अकाउंटशी निगडीत माहिती जसे नम्बर, पासवर्ड  आपल्या डिव्हाईस वर कधीही  सेव्ह करायची नसते. तसेच आर्थिक व्यवहार करताना लागणारे पासवर्ड आपण नियमितपणे  बदलत रहावे म्हणजे अशा डेटाचोरी करणाऱ्यांचे काम अवघड होऊन जाते. डिव्हाईसचाही  पासवर्ड किंवा अनलॉक पॅटर्न हा देखील जाहीररीत्या वापरू नये. तसेच आपण केलेल्या सर्व ऑनलाईन पेमेंटची आपण नोंद केली पाहिजे आणि जेव्हा आपल्या बँकेचे मासिक स्टेटमेंट येते तेव्हा त्यात ह्या नोंदी पडताळून पाहायला हव्यात आणि त्यात काही तफावत आढळल्यास त्वरित आपल्या बँकेमध्ये तसे कळवायलाही हवे !                         

राधा: बाबा, खरच किती महत्वाचे आहे हे !! आम्हा मुलांच्या हातातही किती वेळा फोन असतो. तेव्हा आम्हाला ही माहिती असणे जरुरीचं आहे. ऑनलाईन पेमेंट अँप्लिकेशनच्या जाहिरातीत लहान मुलांना काम करताना पाहून आम्हा मुलांना हे सगळे खूपच सोपे आणि सहज वाटत होते.  पण आपली आर्थिक सुरक्षा अशा प्रकारे धोक्यात येऊ शकते हे तर आताच समजले !!

बाबा : छान !!  टेकनॉलॉजीचा वापर हा फक्त स्मार्ट नाही तर सेफ ही असायला हवा !! ह्या गोष्टींची काळजी नक्की घेत जा आता !!

एवढ्यात दारातून आईने घरी आल्याची वर्दी दिली !! तेव्हा आनंदून राधा म्हणाली,  " बाबा आता पोटासाठी काळ ना मॅगीचा  ना स्वीगीचा ...झाला आता सुगीचा  " !! तिच्या या  हजरजबाबीपणावर बाबांनी तिला टाळी दिली !!


-          रुपाली दीपक कुलकर्णी,
SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक,
ईमेल:  muktangan@swsfspl.com  
मोबाईल क्रमांक: ९०११८९६६८१

Monday, October 7, 2019

मनो-Money: भाग १०: कर नाही तर .... : डॉ. रुपाली कुलकर्णी



मनो-Money: भाग १०: कर नाही तर ....   

"आई ग , कंटाळा आलाय  हा  आयकराचा  धडा  वाचताना ! सगळे कसे ग तांत्रिक शब्द !!" , राधा तक्रारीच्या सुरात आईला सांगत होती. आईने तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाली "ते खूप सोप्पे असते ! मी सांगेन तुला समजावून नंतर." रात्री जेवणाच्या टेबलाभोवती, आई -बाबा, राधा , ओजस दादा , आजी -आजोबा सगळे जमले होते. ओजस म्हणाला, " बाबा, आज शाळेत आम्हाला सुट्टीत कोणी काय काय धमाल केली त्यावर दोन मिनिटे बोलण्याची संधी दिली होती. खूप मजा आली". तेव्हढयात राधाबाईंना काहीतरी आठवले आणि ती उत्साहात सगळ्यांना म्हणाली, " आई, आम्हाला पण शाळेत हे सगळे विचारले होते. तेव्हा मला समजले की मे महिन्यात येऊन गेलेला डिस्ने मुव्हीजचा "अल्लादिन" सिनेमा माझा बघायचा राहून गेलाय. मला तो सिनेमा पाहायचाय बरं  का. पण आता CD आणून पाहावा लागेल. ओरिजिनल CD ची किंमत २५० रु  आहे." यावर आजी पण म्हणाली, "हो हो, CD आणून पाहुयात , म्हणजे मला आणि आजोबांनाही बघता येईल." सगळ्यांनीच या मागणीवर जोर धरलेला पाहून, आईला राधाच्या आयकराच्या धड्याची आठवण झाली आणि ती म्हणाली, " ठीक तर मग !  आपण सगळे रविवारी, CD  आणून हा सिनेमा बघूयात. पण सगळ्यांनाच बघायचा आहे ना, मग त्यासाठी सगळ्यानी काँट्रीब्युशनही  द्यायला पाहिजे.". बाबा म्हणाले, "बरोबर आहे. मी आणि आई सगळ्यात जास्त कमावतो म्हणून आम्ही प्रत्येकी १०० रु . देतो. आजी -आजोबा ज्येष्ठ आहेत, तर त्यांना यातून पूर्ण सूट देऊयात. आणि तू आणि ओजसने,  आपल्या पॉकेटमनीमधून, प्रत्येकी २५ रु. दिले पाहिजेत. आपल्या सगळ्यांना मजा येईल,  तेव्हा आपण सगळे मिळून वर्गणी देऊ.  आहे कबूल ?"  मुलांना हे म्हणणे पटले आणि त्यानुसार घरातील  सगळ्यांनीच आर्थिक योगदान दिले आणि एकत्रित सिनेमाचा आनंद लुटला.

आईने नंतर राधाला समजावून सांगितले, "अग आयकर म्हणजे असेच आर्थिक योगदान जे  पैसे  कमाविणारा प्रत्येक नागरिकसरकारला दरवर्षी जमा करत असतो. समाजात वावरताना, नागरिकांना चांगले रस्ते, परिवहानाची चांगली साधने, सार्वजनिक उद्याने, नाट्यगृहे इ.  अशा  ज्या  काही सामायिक सुविधांची गरज लागते.  त्यासाठी प्रत्येक नागरिक आपापल्या मिळकती / वेतनामधून असे योगदान देत असतो. ह्यालाच  म्हणतात मिळकतीवरील कर किंवा आयकर ! ज्याची मिळकत ज्यास्त त्याने त्याच प्रमाणात योगदान द्यायचे !  जसे  CD आणण्यासाठी मी आणि बाबांनी सगळ्यात जास्त योगदान दिले, अगदी तसेच बरं  का ! प्रत्येकजण आपल्या उत्पन्नानुसार , सरकारने ठरवून दिलेल्या प्रमाणाइतका आयकर भरत असतो.  ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात वेळोवेळी असे कर्तव्य बजावल्याने तसेच उतारवयात त्यांच्या मिळकतीवर मर्यादा येत असल्याने, सरकार त्यांना  आयकरावर  विशेष सूट देत असते. जसे आपणही आजी -आजोबाना या CD काँट्रीब्युशनसाठी वगळले अगदी तसेच. तसेच गरीब वर्ग ज्यांचे  उत्पन्न अगदीच  मर्यदित  असते त्यांनाही आयकर भरावा लागत नाही. आपल्या देशाच्या उभारणीसाठी, सुंदर, स्वछ आणि चांगल्या सोयी-सुविधा मिळविण्यासाठी, योग्य तो आयकर भरणे, हे  प्रत्येक पैसे कमाविणाऱ्या  नागरिकाचे कर्तव्यच असते. "  राधाने हे समजल्याचा अविर्भावात मान डोलावली आणि म्हणाली , " आई , मग हे सगळे चांगले-चुंगले उपभोगायचे असेल तर मग प्रत्येकानेच आयकर भरलाच पाहिजे. बरे झाले बाई, तू आणि बाबांनी मोठ्ठे  काँट्रीब्युशन केले ! नाहीतर आपण सिनेमा कसा काय बघितला असता ?" हसून आई म्हणाली, "अगदी बरोबर !! करभरणा न चुकविता केला  तरच सगळ्यांना चांगल्या सामायिक सुविधांचा लाभ होतो. आणि कर नाही तर ....", राधा आईचे वाक्य पुर्ण करित  म्हणाली, " कर नाही तर....   तर मात्र या सगळ्यालाच घरघर " !! राधाच्या हे वाक्य ऐकून, सगळे घरच हास्यकल्लोळात बुडालें !!     
-           


Wednesday, July 24, 2019

“Financial Pyramid ! A mandate for your Financial Health”- Mr. Raghuvir Adhikari,




“Many many happy returns of the Taxation day !!” Surprised ? Why ? As many will start thinking “Who will happy on the Tax-Day?” Definitely it can be you, provided you mindfully plan your savings and investments in advance, considering your tax payouts. Let me explain using the Financial Pyramid shown below.




Let me elaborate the Financial Pyramid now.

1)    Health is the foundation of your financial pyramid. If this base is strong, the wealth creation begins on the healthy foundation! As soon as you enter into earning phase of your life or start your financial planning, getting the proper health and accident insurance must be though at first because any health issues or happenings of accidents can erode your entire portfolio!  And hence proper coverage against these “wealth leakage factors” is the first step. This also comes with added tax-benefits. Section 80D of Income Tax Act allows you to avail tax deductions, based on the premiums paid for medical insurance or health check-ups for your family, including your spouse, children, and dependent parents. This allows for tax deductible up to Rs 25,000 and for senior citizen (60 years or above), this figure is upto Rs. 50,000 (max). You can avail these benefits for a medical insurance provided by your employer as well as on a standalone policy taken by you. Tax deductions apply to both health insurance and family floater policies. A medical insurance policy allows you to avail tax deduction under Section 80D of Income Tax Act for any expenses incurred for preventive health check-ups. You can avail Rs. 5,000 for the cost incurred for preventive health check-ups for self, spouse, children or parents.
2)    Once you ensure your health aspect, then comes covering the life! having a Life insurance plan is a highly preferred investment option of the taxpayers since many years.  Under 8OC section, taxpayers may claim a deduction for the premium paid by them on the life insurance plan. Under this section, the deduction limit is up to an amount of INR 1.5 lakh.
3)    Then come the top two layers of savings and investments. Savings should be done for your short goals like monthly expenses, paying for school-fees, liquidity requirements in an emergency etc. while the investments should be done for your long-term goals like educations, marriage, purchasing house etc. Saving instruments like Public Provident Fund (PPF) and immediately come to mind when tax saving is the concern. Section 80C, one can save tax on only up to Rs 1.5 lakh. However you won't gain much by investing in PPF if you have already crossed the Rs 1.5 lakh threshold. Equity Linked Saving Schemes (ELSS) funds is an efficient way to save taxes as compared to all the other investment options available under Section 80C of the Income Tax Act. With ELSS, one can invest up to INR 1.5 lakh in a financial year. You are free to invest more than this designated amount, but the excess over INR 1.5 lakh will not qualify you to avail the tax benefits under Section 80C. You should not let go of ELSS as they play a significant role in your portfolio. These pure equity-based instruments carry the potential for higher returns and are an ideal choice of investment for the long term. Also unlike a Public Provident Fund, National Savings Certificate and Employee’s Provident Fund, all of which require a minimum of 5 years lock-in period, ELSS is a better bet with just 3 years of commitment.
The first two levels of the Financial Pyramid (Health, Accident Insurance and Life Insurance) play a crucial of minimization of any “Financial Risk” to your portfolio and the top two layers (savings and investments) are meant for maximization of your “Financial Gain”.

Now let’s turn to the other Pyramid..the Budget Pyramid.

At the beginning of this financial year, as you start thinking on budgeting angle make sure to keep a minimum of 20 to 30 % of your total gross income aside to build your budget pyramid. Out of this amount, 25% share takes care of your Financial Risk and 75% share looks after to your Financial Gain ! If you stick to the “Thorough Implementation” of the Financial Pyramid for minimum 5 years, then the extra returns generated from your 75% budget will automatically take care to generate the 25% budget for you! And this is thrust/beauty of the Financial Pyramid when its starts generating! It certainly takes care of all aspects of life-stage planning and its disciplined implementation results in Wealth Creation !! And when you plan this pyramid with taxation angle, you will certainly wish yourself “Happy Tax-Returns of the Day” !! All the very best to you to begin with your Wealth Creation  Journey!!





Mr. Raghuveer Adhikari,
C.E.O.
raghuvir@swsfspl.com


Thursday, May 30, 2019

मनो-Money: भाग ९: सुट्टी आणि अनुदान !!


मनो-Money: भाग ९: सुट्टी आणि अनुदान  :      रुपाली दीपक कुलकर्णी,

मित्रानो, धमाल चाललीय का मग सुट्टीची ? खुप दिवसांपासून तुम्ही या सुट्टीची वाट पाहिली असेल ! पण या सुट्टीततुम्ही  उन्हाळी शिबीरे, वेगवेगळे छंदवर्ग , खेळ यांच्यापलीकडे जाऊन काहीतरी वेगळे करू शकता का ? चला विचार करू या ! समजाऊन घेऊयात एक नवीन संकल्पना “अनुदान“ अर्थात “सबसिडी” ची राधाच्या गोष्टीतून !!

राधाला सुट्टी लागली ! शाळेच्या शेवटच्या दिवशी , घरी आल्या आल्या म्हणाली, "आई , मी आता 2 महिने या वह्या पुस्तकांकडे अजिबात बघणार नाही बरे !!" आणि मग राधा खेळ, बालनाट्ये, शिबिरे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त झाली. पण काहीच दिवसात, हे सर्व करुन  झाल्यावर  राधाला आला कंटाळा !! आणि आता काय करायचे असा तिला प्रश्न पडला.  तेव्हा आईने तिच्या दप्तरातील सर्व वह्या बाहेर काढल्या आणि तिच्यासमोर ठेवल्या.  आईने बिल्डिंगमधल्या राधाच्या  सगळ्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या जुन्या वह्यांसोबत एकत्र बोलाविले. त्यांना वहीतले सर्व कोरे कागद व्यवस्थीत  बाजूला करण्यास सांगितले. बघता बघता कोऱ्या पानांचा ठीग जमा झाला. त्या मोठ्या ठिगातून, काही पाने उचलून आईने त्यांना वही शिवायला शिकवले । सगळ्यांना ही “बेस्ट फ्रॉम वेस्ट” संकल्पना जाम आवडली.  मुले ,खुष झाली आणि उत्साहाने कामाला लागली. दिवसभरात आपली कल्पकता लढवून मुलांनी सुंदर , सुबक वह्या तयार केल्या. कागदांचा पुनर्वापर केला असल्याने आईने त्यांना सवलतीच्या दरात या वह्यांचा स्टॉल लावण्याची आयडिया सांगितली. मुलांनी बिल्डिंगखाली ह्या सवलतीच्या दरातील वह्यांचा स्टॉल लावला.  त्या बिल्डिंग मध्ये काम करणाऱ्या बऱ्याच कामगारवर्गाला यामुळे कमी दरात वह्या विकत घेता आल्या. त्यांना मदतही झाली आणि मुलांनी  स्वकमाईचा आनंदही घेतला !!

बालदोस्तानो, आपल्या देशातील बहुसंख्य लोक गरीब आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तू विकत घेता याव्या म्हणून आपले सरकारही अशा वस्तूंच्या मूळ किमतीत सूट देऊन, त्या सवलतीच्या दरात त्यांना उपलब्ध करून देते. ह्यालाच म्हणतात अनुदान / सबसिडी. जसे शेतकरी वर्ग खूप मेहनत करून शेतात उत्पादन घेत असतो. परंतु खराब हवामानामुळे त्यांची पूर्ण मेहनत वाया जाऊ शकते. असे झाले तर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. परंतु अन्न ही जीवनावश्यक वस्तू असल्याने सरकार बी-बियाणे, खते, शेतीची अवजारे आणि वीज या गोष्टींसाठी शेतकऱ्यांना अनुदान म्हणजेच सवलत देते. खेडेगावांमधील शाळा, जेथे शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे आहे, तेथेही सरकारी अनुदानित शाळा असतात.  दुष्काळग्रस्त भागात, टंचाईमुळे वस्तूंचे दर खूपच वाढले तर सामान्य जनतेला त्या खरेदी करता याव्या, म्हणून जीवनावश्यक वस्तू अनुदानित करण्यात येतात. हे सर्व करताना सरकारला जो पैसा लागतो, तो आपण भरत असलेल्या कराद्वारे सरकारला उपलब्ध होत असतो. तेव्हा कर भरणे म्हणजे एकप्रकारे आपल्या देशातील गोरगरीब जनतेला मदत केल्यासारखेच आहे.

मित्रानो, या सुट्टीत राधाप्रमाणे तुम्हीही  काही स्वकमाई सारखे काही वेगळे उपक्रम करून, गरजु-वर्गासाठी अनुदानित वस्तू उपलब्ध करून देऊ शकता किंवा त्या दान करुन मदतही करू शकता. जसे वर्षभर तुम्ही वापरलेल्या पुस्तकांना नवीन कव्हर्स लावता येतील, नवीन गणवेश, दप्तरे यांची खरेदी होणार असल्यास, तुमच्या या वस्तू व्यवस्थीत स्वच्छ करुन शाळेत गरजू मुलांसाठी जमा करता येतील, उन्हाळ्याची सरबते, पन्हे किंवा तुम्ही केलेली भेटकार्डे यांचा स्टॉल लावून निधी जमा करता येईल व त्यातून गरीब विद्यर्थ्याना मदत करता येईल. आहे न भारी? करणार का तुम्ही  सुट्टीत  “दान / अनुदान” संकल्पनेवर काम ? माझ्या कडून धमाल सुट्टीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !! Happy Vacations !!

-          रुपाली दीपक कुलकर्णी,
SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक,
ईमेल:  muktangan@swsfspl.com  
मोबाईल क्रमांक: ९८२२०००८८३, ९८२२४०८०९३.




Wednesday, April 10, 2019

मनो-Money: भाग ८: नको तो काळा पैसा : डॉ. रुपाली कुलकर्णी




बालदोस्तांनो, आत्ता नुकत्याच देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. तेव्हापासून घरात, टीव्हीवर, वर्तमानपत्रात सगळीकडे निवडणुकीच्याच चर्चा सुरू आहेत. कुठला पक्ष काय उद्देश ठेवून निवडणूक लढविणार, कुठून कोणता उमदेवार उभा राहणार वगैरे, वगैरे ! या सगळ्या गदारोळात तुम्ही काळा पैसा हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल.  हा शब्द ऐकून तुम्ही कधी विचार केला आहे का, की काय असतो काळा पैसा ? सांगते, ऐका का किस्सा !

एकदा माधुरी काकूने घरात काम करणाऱ्या संगीता मावशींना शंभर रुपये देऊन, दोन किलो गहू आणून ठेवायला सांगितले. मावशींनी 40 रुपये किलो दराने दोन किलो गहू आणून ठेवले आणि माधुरी काकूला मात्र पन्नास रुपये किलो असा दर सांगूनसगळेच पैसे वापरल्याचे खोटेच सांगितलेम्हणजेच  संगीता मावशींनी वरचे वीस रुपये फुकटच लाटले ! संगीता मावशींनी हे पैसे गैरमार्गाने मिळविले.  असा अनधिकृत मार्गाने आलेला पैसा,  ज्या पैशावर आपला हक्क नाही, जो पैसा कमविण्यामागे असणारा उद्देश्य योग्य नाही, असा पैसा कुठून, कोणाकडून, केव्हा, कसा आला याची कुठेही नोंद नाही तो सर्व झाला काळा पैसा ! असा पैसा, संगीता मावशींच्या वीस रुपयाप्रमाणे , अयोग्य मार्गाने उपलब्ध झाल्याने रोकड स्वरूपात असतो.

दोस्तांनो, आपल्या सर्वांनाच देशात चांगल्या सुविधा असाव्यात, देश आर्थिक आणि तांत्रिक बाबतीत सशक्त असावा असे वाटत असते. ह्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सरकारला पैशाची आवश्यकता असते. तेव्हा काळा पैसा, ज्याची कुठेही नोंदच नाही आणि म्हणून जो सरकारला वापरताच येणार नाही, देशाच्या प्रगतीसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक ठरत असतो. कारण, अशा पैशाच्या माध्यमातून लोकहिताची कुठलीही कामे करणे सरकारला शक्य नसते. आपल्या देशात जवळपास दोन तृतीयांश पैशाची ही अवस्था आहे !! आहे ना चक्रावून सोडणारी करणारी गोष्ट?  म्हणून काळा पैशाचा उद्गम आणि वापर रोखण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थी म्हणून तुम्ही पुढील काही गोष्टी नक्कीच करू शकता. १) आपल्या घरातील जास्तीतजास्त व्यवहार हे बँक खात्याच्या मार्फत किंवा चेक/ क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड यामार्फत करू शकतो. यामुळे पैशाच्या आवक-जावकाचे कारण सुस्पष्ट राहते. 2) आपल्या आजूबाजूच्या, घरी कामे करण्यास येणाऱ्या सर्वजणांना आपण बँक खाते उघडण्यासाठी आणि त्याद्वारेच व्यवहार करण्यासाठी प्रेरित करू शकतो. 3) आपल्या घरी कामे करण्यास येणाऱ्या सर्वजणांचा पगार, आई-बाबांनी बँक खात्यातच जमा करावा असा आग्रह आपण धरू शकतो. ४) आपले किंवा इतरांचे कुठलेही काम चटकन किंवा प्रलोभने दाखवून करून देण्याऱ्या आणि त्यासाठी  पैसे मागणाऱ्या व्यक्तीला आपण स्पष्टपणे नाही म्हणू शकतो.     ५) इंटरनेट चा वापर करून, आपण नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, भीम किंवा तत्सम सुरक्षित पेमेंट अँप्लिकेशन्सच्या , कुशलतापूर्वक वापरासाठी, पालकांची / विश्वासू तज्ज्ञांची मदत घेऊन आवश्यक ते ज्ञान मिळवू शकतो.

मित्रानो, जरा जास्तीच वाटतेय का हे ? पण हे शक्य करून दाखविले आहे गुजरातमधील GNFC नामक वसाहतीने. पाच हजारावर सामान्य वस्ती असणाऱ्या या वसाहतीमध्ये, दुकानात पान घेण्यापासून ते सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्यासारखी छोटी कामेही कॅशलेस पद्धतीने म्हणजेच डिजिटल पैशांचा वापर करून केली जातात. GNFC या खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीने, पन्नास हजाराहून अधिक शेतकऱ्यांना, कॅशलेस पद्धतीने खतविक्री केली आहे आणि दिवसोंदिवस ही संख्या वाढतेच आहे. आहे ना हे प्रेरणादायी ?  आपल्यालाही हे शक्य आहे ! देशहितासाठी योगदान देताना, सीमेवर जाऊन लढाईच केली पाहिजे असे गरजेचे नाही. आपापल्या ठिकाणी राहून, उत्तम नागरिक बनूनही आपण देशासाठी योगदान देऊ शकतो. त्यासाठी तयारी हवी ठाम निर्धाराची आणि त्यादिशेने शिस्तबद्ध वाटचाल करण्याची !! मग, करा ठाम निर्धार, आपल्या आवाक्यातील काळ्या पैशाची निर्मिती रोखण्याचा !!