Thursday, December 27, 2018

फ्री-ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म की आर्थिक सल्लागार ? : डॉ. रुपाली कुलकर्णी





आजकाल सगळ्या  "स्मार्ट" गोष्टींची  चलती आहे  !! म्हणजे स्मार्टफोन , स्मार्टकार , स्मार्टस्पीकर वगैरे .म्हणजेच  इंटरनेटचा  वापर करून, आपले दैनंदिन काम सोपे करणाऱ्या गोष्टी !! मग आजकालची ही स्मार्ट पिढी , स्मार्ट गुंतवणुकीकडे  नाही वळली  तरच नवल !! स्मार्ट गुंतवणुक म्हणजे ऑनलाइन गुंतवणुक प्लॅटफॉर्मचा  वापर करून, तिथून मिळालेल्या (स्मार्ट??) सल्ल्यानुसार आपली गुंतवणुक करणे.  असा सल्ला देणाऱ्या अनेकविध फ्री वेबसाईट तसेच फ्री मोबाईल  आप्लिकेशन्स  उपलब्ध आहेत. मग काही जणांना त्यातून असे वाटू शकते की, "हे सगळे इतके सहज, सोपे आणि हातासरशी (की बोटांसरशी) उपलब्ध असताना आर्थिक सल्लागाराची आवश्यकताच  काय ? गुंतवणूकदारांना आर्थिक बाबींवर तज्ञ मार्गदर्शनाची गरज खरंच आहे  का?"  याचबद्दलच जरा मुद्देसूद बोलूयात. माझ्यामते, गुंतवणूकदारांनी  आर्थिक सल्लागाराच्या मदतीविना केलेल्या गुंतवुकीबाबत बरेचदा चुका होऊ शकतात किंबहुना होतातच !
या चर्चेदरम्यान आपण  फ्री ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मला  OIP असे  संबोधूयात. आता खालील मुद्द्यांचा विचार करू.  

१)  सहृदयी मित्र की  यंत्रवत सेवा तुमच्या  आर्थिक सल्लागाराला  तुमच्याविषयी सर्व आर्थिक माहिती असते. तुमच्या कुटुंबातील सदस्य संख्या. एकूण मिळकत, गरजा, तुमचे दायित्व (कर्जे आणि कर), अडचणी, तुमची स्वप्ने, तुमच्या बचत अथवा गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये  इत्यांदीबाबत, तुमच्या आर्थिक सल्लागाराला संपूर्ण माहिती असते. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे, हुशारीने प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विचारलेली आवश्यक ती आणि इतर पूरक माहिती, आर्थिक सल्लागाराला विदित असते, त्यामुळे तो तुम्हाला सर्वमावेशक सल्ला देऊ शकतो. तुमच्या आर्थिक उद्दिष्टयाना गवसणी घालण्याचा प्रवासाततुमचा आर्थिक सल्लागार तुमचा एक कौटुंबिक,सहृदय मित्र बनलेला असतो. तुमच्या आर्थिक ध्येयांबाबत तो सतत जागरूक असतो. याउलट  OIP ही एक यंत्रवत सेवा आहे (Mechanical Service ). इथे  तुमच्या आर्थिक तसेच  कौटुंबिक परिस्थिती बद्दल असणारी  "जाणीव", "संवेदनशीलता"  यांचा पुर्णतः आभाव असतो !! तुम्ही निवडलेली  OIP,  केवळ तुम्ही पुरविलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला गुंतवणुकीची योजना (Scheme) सुचविते. आर्थिक सल्ला देताना आवश्यक असणारी "सर्वसमावेशकता" याचा कोणताही विचार OIP सेवा करत नसल्या कारणाने, अशी सेवा कोठल्या दर्जाचा सल्ला तुम्हाला देते, हे उघडच आहे !!

२) हेतुशुद्धता की हेतुपुर्वकता? तुमच्या आर्थिक सल्लागाराचा एकमेव हेतू हा तुम्हाला, तुमच्या आर्थिक उद्दिष्टांबाबत  सर्वसामावेशक असा सल्ला देणे असा सरळ असतो. तुमच्या गरजेनुसार विविध आर्थिक योजनांमधून, तुमच्यासाठी योग्य असणारी आर्थिक योजना किंवा आराखडा तुम्हाला देणे असे आर्थिक सल्लागाराचे काम असते. यात कुठल्याही एकाच योजनेचा (Product or  Scheme)  विचार होत नाही .परंतु बव्हतांशी OIP सेवा मात्र केवळ विशिष्ट आर्थिक योजनांबाबतच सल्ला देताना दिसतात. या अशा योजना असतात ज्यामध्ये  मिळणारे  आकर्षक कमिशन हा  एक, तुम्हाला न दिसणारा अदृश्य घटक असतो. अशा केवळ काही संस्थाना समर्पित असणारी  OIP सेवा , तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची चिंता करत असावी का?

३) प्रक्रिया की प्रासंगिकता ?  "गुंतवणुकीबाबत आर्थिक सल्ला" ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे (Process) केवळ एक प्रासंगिकता (Event) नव्हे.    तुमचा आर्थिक सल्लागार, आर्थिक नियोजनाच्या  संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, तुमची सोबत करणारा मार्गदर्शक असतो. बदलते कायदे, नियम, मिळकती, बाजारातील चढ उतार असे आर्थिक मुद्दे असोत किंवा घरातील बदलती परिस्थिती जसे नवीन सदस्याचा घरात प्रवेश किंवा घरातील कोणाचे लग्न, शिक्षण किंवा मृत्यू आदी कारणाने निर्गमन अशा कौटुंबिक बाबी असोत, आर्थिक सल्लागार अशा बदलत्या आयामांनुसार, तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये सक्रियतेने बदल करित असतो (Active Management). आता  OIP चा विचार करू. अशी सेवा वापरून केलेली गुंतवणुक ही एक प्रासंगिकता असते. त्या गुंतणवुक-प्रसंगाशी निगडीत असणाऱ्या आर्थिक बाबी सोडल्या, तर तुमच्याशी निगडीत असणाऱ्या बदललेल्या आर्थिक  किंवा कौटुंबिक बाबी, अशी सेवा लक्षात घेत नाही.  अपुऱ्या किंवा दुर्लक्षित माहितीच्या आधारे दिला जाणारा, असा OIP सल्ला कितपत योग्य असेल? हे  तर तुमच्या आर्थिक नियोजनाचे  "प्रासंगिकीकरण " (Passive Management) झाले.                       

४) माहितीची गोपनीयता की हस्तांतरण ?  एक विश्वासाहार्य आर्थिक सल्लागार, तुमच्या बाबतीतली सर्व आर्थिक,कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली माहिती त्याच्याच पुरती मर्यादित ठेवीत असतो. यात तुमची एकमेकांप्रती असलेली निष्ठा आणि संवेदना (Sensitivity) यांची भावनिक जोड कारणीभूत आहे. परंतु   OIP सेवेमार्फत केलेल्या गुंतवणुकीच्या गोपनीयतेचे काय ? अशा सेवेला तुम्ही पुरवलेली माहिती, ही  केवळ त्याच  सेवेपुरती वापरली जाते (Data Privacy) आणि इतर कोणालाही  ती पुरविली जात नाही असे तुम्ही ठामपणे म्हणू शकता का ? किंबहुना अशी  माहिती पुरविल्यानंतर तुम्हाला, इतर तत्सम  उत्पादनांबाबत अनेक जाहिरातपर (Promotional)  इमेल्स, मेसेज येणे सुरु होते.म्हणजेच तुम्ही  OIP सेवेला पुरविलेली माहिती ही इतर अनेक संस्थाना पुरवली जात असण्याची शक्यता असते. तुम्हाला तुमच्याच अशा खाजगी माहितीचे हस्तांतरण होणे आवडेल का ?                                  

५) आराखड्यावर काम की प्रलोभने ? तुमच्याशी सर्व बाबतीत चर्चा करून, योग्य असा आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करणे (Financial Plan)  आणि शिस्तबद्धरीत्या (Disciplined Active Management) तो अंमलात आणणे (Execution) , हे तुमच्या आर्थिक सल्लागाराचे काम आहे. यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची आमिषे दाखविणे, सवलती देणे अशा संबंध नसलेल्या कोठल्याही कृतीचा समावेश कधीच केला जात नाही. परंतु  OIP सेवेबाबत हे ठामपणे लागू होत नाही. अमुक एक आर्थिक योजना घेतली तर तमुक एका योजनेत सवलत (Discount) , एखादे सवलत कुपन, जोड योजना इ. आमिषे दाखवून तुम्हाला आर्थिक योजना पुरविणारी अशी   OIP सेवा, आर्थिक नियोजनाशी निगडीत नसणारे असे  सगळे उद्योग का करीत असावी ? त्यात त्यांचा काही वैयक्तिक  फायदा असल्याशिवाय अशा अनावश्यक सुविधा पुरविणारी  OIP सेवा कितपत विश्वासाहार्य वाटते ?       

वरील सर्व मुद्द्यांचा उहापोह झाल्यावर, या स्मार्ट गेझेटच्या युगातही , तज्ञ् , आर्थिक सल्लागाराची भूमिका  ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म करूच शकत नाहीत हे आपल्या लक्षात आलेच असेल. शेवटी पैसा हा भावनेशी निगडीत असतो म्हणूनच आर्थिक सल्लागार खरे पाहता तुमची पैशां मागची Emotional Management  च करीत असतो.  आणि म्हणूनच हे करण्याकरिता भावना जाणणारा, जपणारा "माणूस" तेथे आवश्यक असतो. त्याची जागा कोणतेही यंत्र अथवा यांत्रिक सेवा घेऊच शकत नाहीत.

   - रुपाली कुलकर्णी 
     SWSFSPL
      


Thursday, December 20, 2018

सुयोग्य आर्थिक नियोजन ..अत्यावश्यक गरज : श्री. ऋषभ सोनवणे.



नमस्कार ! आज तुमच्यासमोर आमचा  असा एक अनुभव  मांडत  आहे , ज्याद्वारे  सुयोग्य  आर्थिक नियोजन करणे किती महत्वाचे  हे  पुनः सुस्पष्ट होते आहे.  (नोंद : या लेखातील नाव बदललेले आहे. )


नाशिकमधील प्रसाद  हा  नोकरीनिमित्त दुबई राहणारा  तरुण  व्यवसायाने सॉफ्टवेअर कन्सल्टंट आहे. आजतागायत बारा वर्षांपासून  तो  दुबईत कार्यरत आहे आणि  आपल्या  कुटुंबासोबत  तो दुबईतच  स्थायिक झालेला  आहे.  आपल्या नोकरीच्या ठिकाणी योग्य ती मेहनत करून व सचोटीने काम  करून  प्रसादने   पुष्कळ  पैसा  कमाविला आणि त्याद्वारे तसेच काही गृहकर्जाची मदत घेऊन, भारतातील भविष्यातील वास्तव्यासाठी, त्याने ठाणे येथे एक फ्लॅट खरेदी केला.  नियमित पगार चालू असल्यामुळे ह्या कर्जाचे हफ्ते  वेळेवर भरले जात होते व सर्व काही सुरळीत चालले होते. अशातच एकेदिवशी त्याच्या  वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाला.  डॉक्टरांनी वडिलांची बायपास सर्जरी करण्यास सुचविले.  प्रसादने  डॉक्टरांच्या सल्य्यानुसार, वडिलांचे ऑपरेशन करवून घेतले. त्यावेळी,  वडिलांचा कुठलाही आरोग्य विमा केलेला नसल्याने प्रसादला आपल्या गुंतवणुकीतून पैसे द्यावे लागले  व यात प्रसादची सर्व गुंतवणूक संपली.  दुर्दैव इथेच थांबले नाही.   त्यानंतर प्रसादची  नोकरीही  गेली. नवीन नोकरीच्या शोधात असताना पुढील सहा महिने निघून गेले. परिवाराचा भार, जीवनावश्यक वस्तू आदीसाठी प्रसादला क्रेडिट कार्डचा वापर करावा लागला. दुबईतील महागाईचा सामना करताना क्रेडिट कार्ड चा वापर इतका जास्त होत गेला की त्याला क्रेडिट कार्डवर कर्ज घ्यावे लागले.  पुढे सर्व बचतही संपुष्टात आल्यावर क्रेडिट कार्ड कर्जाचे हफ्ते थकले.  तसेच ठाणे इथल्या फ्लॅटच्या गृहकर्जाचे हफ्तेही  थकले व प्रसाद  "डिफॉल्टर" झाला .डिफॉल्टर झाल्यामुळे त्याचे सिव्हील रेकॉर्ड खराब झाले. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी  त्याने इतरत्र  कुठे  नवीन कर्ज घेण्याचा प्रयत्न केला परंतु डिफॉल्टरचा  शिक्का बसल्यामुळे  प्रसादला नवीन कर्जही  मिळेनासे झाले. शेवटचा पर्याय म्हणून नातेवाईकांकडे पैसे मागण्याची वेळ  प्रसादवर आली.  सुदैवाने नंतर  त्याला इजिप्तमधून एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आणि काही महिन्यांच्या कालावधीनंतर  प्रसाद आर्थिक संकटातून बाहेर आला. परंतु या सर्व प्रकारात झालेला मानसिक त्रास, पैशनिगडीत आलेले आपल्याच माणसांचे वाईट अनुभव त्याच्या आणि कुटुंबाच्या खच्चीकरणास कारणीभूत ठरले.        

आता आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून प्रसादच्या काय चुका झाल्या ते बघुयात.

१) आपली नोकरी / व्यवसाय कसाही असला तरी पुढील कमीतकमी सहा महिन्यांपर्यतच्या दैनंदिन खर्चाचा विचार करून, आपण तेवढी रक्कम बचत खात्यात कायम राहील याचा विचार केलाच पाहिजे. प्रसादच्या बाबतीत हे होत नव्हते. पुष्कळ पगार आणि दुबईतील वास्तव्यचा पुष्कळ खर्च यांचा तोल न सांभाळता आल्याने, कोठल्याही नियमित / अनियमित / अतार्कीक खर्चासाठी कुठलीही आर्थिक व्यवस्था त्याने केलेली नव्हती. 

२) कुटुंबातील सर्व  सदस्यांच्या योग्य तो आरोग्य , जीवन तसेच अपघाती विमा हा अत्यावश्यक आहे. तो नसल्यास, काही दुर्दैवी प्रसंगामुळे आतापर्यंत केलेली  सर्व बचत किंवा गुंतवणुक संपुष्टात येऊ शकते. प्रसादच्या वडिलांचा आरोग्य विमा नसल्याने, त्यांच्या उपचारादरम्यान , त्याने केलेली सर्व  बचत तसेच गुंतवणूक पूर्णपणे वापरली गेली आणि त्यात नोकरीही गेल्याने आर्थिक संकट उभे ठाकले. 

३) आपण करीत असलेली गुंतवणुक , ही महागाईचा  दर विचारात धरूनच केलेली असली पाहिजे. ते न झाल्यास अशा गुंतवणुकीचा उपयोग , महागाईचा सामना करताना होतच नाही. प्रसादने केलेल्या बचत आणि गुंतवुकीच्या प्रकारात हा विचार झालाच नव्ह्ता.                       

या सर्वातून, एक गोष्ट लक्षात घेण्यासरखी आहे की पैसा कमावणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच  त्याचे व्यवस्थापनही !! सर्व प्रकारचा सुयोग्य विमा,   अत्यावश्यक खर्चासाठी  तरतूद, गरजांप्रमाणे सुयोग्य गुंतवणुकीचे माध्यम हे सर्वच "आर्थिक नियोजनाचे" महत्वाचे घटक आहेत. असे नियोजन हे आर्थिक, कौटुंबिक, परिवारातील सदस्य संख्या,  विशिष्ठ  गरजा, घेतलेले कर्ज  आदी बऱ्याच बाबींवर अवलंबून असते आणि म्हणून ते करण्यासाठी योग्य, तज्ञ् आर्थिक सल्लागाराची मदत घेणे केव्हाही चांगले !!       

या अनुभवातून  शिकून तुम्हीही,  ऐनवेळी च्या आर्थिक संकटाचे नियोजन केलेले आहे, हे तपासून बघाल ना ? मदतीस आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत !! कधीही हाक घाला....धन्यवाद !!

ऋषभ भरत सोनवणे. 
SWSFSPL 

Tuesday, December 11, 2018

Judging the Scheme Performance? Wait, Read This !!- Mr. Neeraj Adbe




A very common question always asked by the investors is like, “In the one year, returns on Mutual Fund Equity Investment is 10% whereas Market has grown by 20%, So why  that my investment is not performing?”

Such question may arise in mind of investors which is a good sign of their activeness and alertness towards their investments.

There are 3 aspects on which the question can be answered.

1) Fund Performance

If a particular Equity fund performance is to be evaluated then comparison of its performance with the performance of Sensex or Nifty index should not be the only criterion. In a particular fund scheme, there are generally several stocks which are not part of Sensex or Nifty stocks. Thus, performance of fund should always be compared with the respective Bench Mark index. After this comparison one may observe that though Sensex / Nitfy may have performed well, the bench mark index has not done that good. So, Bench Mark Index is first aspect.


2) Period of Investment

The investment in mutual funds for the period of 1 to 2 years is considered as short-term investment period which is not sufficient to judge the performance of the scheme. The returns in the very first year may be very low or even can be high returns and both the cases can’t be taken as criteria to judge the performance of the scheme. Also, one cannot ascertain that which category is going to outperform or low perform in the future. This is the reason why the portfolio should be diversified into Debt, Hybrid & Equity investment schemes. Equity fund gives growth in long term whereas Hybrid & debt funds provide stability. So Period of Investment is the second aspect.


3) Purpose of Investment

This is supposed to be the most important but unfortunately the most neglected criterion. We, as Financial Advisor always request our clients to define purpose of the investment. For example, if someone is investing for retirement approaching after 20 years, then we insist not to track the scheme performance for at least 12-15 years and keep accumulating to the investment amount. Returns on the long-term investments in Mutual funds have paid the good returns. So third aspect is Purpose of Investment.

Conclusion:

Actually, Investing in Equity or Mutual Funds is like playing a Test Match. The more you stay on the crease; chances are more to make high scores. The Run Rate (Rate of Return) is not that important. If we continuously focus high Run Rate (returns), there are high chances of getting out at early stage. We just need to ensure we are playing with a good batsman irrespective of whether he is Virat, Sachin, Dhoni or Shikhar, Rahul or Rohit. We know all shall score high if any of them remain on crease for a longer time. As we don’t know who is going to score more in the long run, we cannot assure high returns on any single scheme. Also, to be in the leading position, we need to do few adjustments in the batting strategy (Portfolio Balancing) leveraging on the situation offered from the opponents (Market).

Here, in this inning of your investments with you as a batsman, your Financial Advisor plays the role of Buddy on the pitch, who holds your hands in all situations and manages your emotions and hence your performance!!

Hence investment in Mutual Funds or Equity is playing like a Test Match where rate of return is just a check, whereas consistency and staying on the crease for long time is the key to WIN. Hold hand of right buddy to achieve Best Performance!!


-          Mr. Neeraj Adbe,
          Head, Nagpur Branch,
          S.W.S.F.S.P.L.

मनो-Money : भाग ५ : शेअरिंग , शेअर्स बद्दल : डॉ. रुपाली कुलकर्णी




बालमित्रांनो , ह्या मागच्या काही  दिवसांत  तुम्ही  वर्तमानपत्रांमधून  "शेअर बाजार ", "स्टॉक  मार्केट"  हे  शब्द बरेचदा वाचले असतील.   कदाचीत  तुमच्या   घरातील  वडील मंडळींच्या  बोलण्यातून तुम्ही हेही  ऐकले असेल  की शेअर बाजार "वधारतो" किंवा "कोसळतो" !! तर आज मी तुमच्याबरोबर ह्या शेअर्स बद्दल थोडे शेअर करणार आहे !!   गडबडून जाऊ नका ! तुम्हाला हे काही किचकट प्रकरण वाटते आहे का ? काळजी करू नका. आपण गोष्टीरूपातून समजावून घेऊयात  न !
राधा , सारा आणि स्वराज ही  एकाच बिल्डिंग मध्ये राहणारी  आणि एकाच  शाळेत  शिकणारी दोस्तकंपनी !! एकदा  त्यांना शाळेत "खरी कमाई" हा प्रयोग करून बघण्यास सांगतात. म्हणजे काय, तर घरातील  मोठ्या मंडळींची मदत न घेता, लहान -मोठे काम करून , "आपल्या  खऱ्या कष्टाचे पैसे कमवायचे " !! स्वतः काम करून पैसे  मिळवण्याच्या विचाराने, तिघेही खूपच उत्साहित होतात. थंडीचे दिवस सुरु झाले असतात म्हणून ते  कॉफीचा  स्टॉल लावूयात, असे ठरवितात. राधा आणि सारा आपल्या पॉकेटमनीतून  प्रत्येकी ४० रु. तर स्वराज २० रु. देतो. जमलेल्या १०० रु. मधून, कॉफी पावडर, साखर, दुध, पेपरकप असे साहित्य आणले जाते. सगळे  मिळून मस्तगरमागरम कॉफी तयार करतात. किती ? १०० कप !!  प्रति कप  २ रु. असा भाव ठरवितात  आणि मग संध्याकाळी बिल्डिंगखाली ते आपला "फक्कड कॉफी स्टॉल " लावतात. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बिल्डिंगमधली सगळी दोस्तकंपनी आणि आजी -आजोबा मुलांच्या स्टॉलवर जाऊन झक्कपैकी कॉफीपान करतात. बघता बघता १०० कप कॉफी संपते आणि  एकूण  २०० रु. ची " खरी कमाई" केल्याचा आनंद तिघांनाही होतो !! आता प्रश्न उरतो, तो नफा वाटपाचा !! ही हुशार मुले आपले गणितातील गुणोत्तर वापरतात. राधा  म्हणते  "१०० रु  मधील, माझा  सहभाग  ४० रु. होता , तर २०० रु. मध्ये तो किती असेल? बरोबर ८० रु. !!".  मग राधा आणि साराला प्रत्येकी ८० रु. तर स्वराजला  ४० रु. मिळतात . दामदुप्पट !! मुले जाम खुश होतात.    
मित्रांनोशेअर्स हे  पैशांच्या गुंतवणुकीचे एक लोकप्रिय माध्यम आहे.  एखादी कंपनी (जशी  आपली "फक्कड कॉफी स्टॉल" !) जनतेला आपल्या कंपनीचे  शेअर्स देऊन, त्यांना आपल्या कंपनीच्या प्रगतीमध्ये सामील करून घेते आणि आपली मालकी अनेक समभागात वाटते. लोक हे  समभाग / शेअर   विकत घेऊन, कंपनीच्या नफ्यात भागीदार बनतात. (जसे "फक्कड कॉफी स्टॉल" कंपनी चे तीन भागीदार होते.) जेव्हा कंपनी नफा कमविते  तेव्हा हा  कंपनीच्या शेअर चा भाव वाढतो (वधारतो). याउलट  कंपनीला तोटा झाला तर हा भाव कमी होतो (कोसळतो ). झालेला नफा किंवा तोटा, यांच्या  प्रमाणात समभाग धारकांना (शेअर होल्डर्स ) परतावा मिळतो. (जसे राधा आणि सारा ला नफ्यातील ४०% आणि स्वराज ला २०% परतावा मिळाला). खऱ्या शेअर बाजारात, वैयक्तिक गुंतवणूकदारां प्रमाणेच  म्युच्युअल फंड, बँका, विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार सहभागी होतात आणि मोठ्या प्रमाणात समभागांची खरेदी किंवा विक्री चालते.  शेअर बाजारात पैसे  गुंतवून नफा कमविण्यासाठी , त्याचा नीट अभ्यास करणेवेगवेगळ्या कंपनींच्या प्रगतीविषयी  योग्य ज्ञान असणे गरजेचे असते. (कारण सगळ्याच कंपन्या आपल्या "फक्कड कॉफी स्टॉल" प्रमाणे नफा कमवीत नाहीत. आपल्या तिघा दोस्तमंडळींनी थंडीच्या दिवसात कॉफीचा स्टॉल लावला म्हणून सगळ्यांनी मिळून ती कॉफी संपली. पण त्या ऐवजी या तिघांनी कॉफी ऐवजी आईस्क्रीम चा स्टॉल लावला असता, तर त्यांना कदाचित तोटाही होऊ शकला असता.). "योग्य प्रगतीशील कंपनीमध्ये, दीर्घकालीन केलेली गुंतवनूक, अधिक परतावा देते", हे अनुभवांती सिद्ध झालेले आहे. मित्रानोमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की, वॉरेन बफे  यांनी  वयाच्या ११व्या वर्षी शेअर बाजारातून, आपला पहिला शेअर विकत घेतला होता आणि आज जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आहे !!  तेव्हा, तुम्हालाही असे करून बघायला आवडेल का?.  करा विचार आणि लागा कामाला !!            
- रुपाली दीपक कुलकर्णी,
SWS फायनानंशिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक,