संध्याकाळी शाळेनंतर घरी पोहोचताच, थालीपीठाचा खमंग वास राधाच्या नाक
शिरला. चक्क बाबांना स्वयंपाकघरात थालीपीठ
करताना पाहून राधा चित्कारली , "अरे वा , बाबा तूम्ही ? भारीच झालेले दिसते थालीपीठ ! मला
वाटले होते आज आई नाही तर आजचे जेवण मॅगीचे नाहीतर स्वीगीचे !!" यावर बाबांनी
तिला हसून दाद दिली. नंतर थालीपिठावर ताव मारता मारता दोघांच्या गप्पा सुरु
झाल्या.
बाबा : म्हणजे राधाबाई , तुम्हीसुद्धा आईच्या मोबाइलवरून उबर
इट्स, स्वीगी वापरता
वाटते ?
राधा : हो बाबा ! त्यात काय मोठेसे !! कधी कधी आईला ऑफिसमधून यायला
उशीर झाला, की तिलाही हे असे
जेवण मागविणे खूप सोयीचे ठरते आणि शिवाय ती
आपल्या मावशींच्याच घरगुती मेस वरून मागविते तेव्हा ते असतेही रुचकर !! मी
आईला हे वापरताना पहिले आहे तेव्हा आता
मलाही ते जमायला लागले आहे .
बाबा : अरे वा ! अडचणीच्या
वेळेस टेकनॉलॉजीचा वापर करता आला आणि त्यात आपली सोय झाली, तर त्यात वावगे
काहीच नाही !! फक्त स्मार्टफोन हा स्मार्टपणे वापरताही यायला हवा बरका !
राधा : म्हणजे काय हो बाबा ? मी तर चुटकीसरशी आईचे हे काम करू
शकते . मग झाले की नाही मी स्मार्ट ?
बाबा : अग हो हो ...थांब जरा. तू सायबर फ्रॉडस विषयी ऐकले आहेस का
कधी ?
राधा : आता हे हो काय नवीन बाबा ?
बाबा : अग, इंटरनेट चा वापर करून, वेबसाईट किंवा मोबाईलवरील
अँप्लिकेशन मधून ऑनलाईन पेमेंट्स करण्याचे
प्रमाण खूपच वाढले आहे.टेकनॉलॉजीचा वापर करून त्याद्वारे वेळ वाचविता येतो. पण
आपल्या बँक अकॉउंटची माहिती, जर आपण आवश्यक ती काळजी न
घेताच अशी इंटरनेटच्या माहितीजालावर
पसरविली तर तिचा गैरवापर होऊ शकतो आणि
आपल्या बँक अकॉउंटमधून कोणी परस्पर काही आर्थिक व्यवहार करू शकते. अशा
इंटरनेटवरून होणाऱ्या गैर व्यवहारांना म्हणतात
सायबर फ्रॉड! यात आपले लहान/ मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
राधा: बापरे , आपलाच पैसा असा इतर कोणी वापरणे हे तर भयानकच आहे. ! मग हे मोबाईलवरील अँप्लिकेशनवरून पैशाचे व्यवहार करूच
नयेत का ?
बाबा : असे अजिबात नाहीय ! फक्त आपल्या माहितीचा वापर इंटरनेटवर
करतांना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
राधा: म्हणजे आम्ही मुलांनी काय करायचे तितके सांगा ना ..
बाबा : हे बघ, ऑनलाईन पेमेंट
करताना, बँके अकाउंटशी
निगडीत असणाऱ्या मोबाइलनंबरवर हे पेमेंट तुम्हीच करत आहात ना हे तपासण्यासाठी
"वन टाइम पासवर्ड " चा मेसेज होतो. हा पासवर्ड तुम्ही पेमेंट करण्याआधी
कोणालाही द्यायचा नसतो किंवा शेअर करायचा नसतो हे माहित असायला हवे. शिवाय
कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर इंटरनेट सुरु असताना आपण "फ्री वायफाय" चा
वापर कधीच करू नये. असे फ्री मिळणारे नेटवर्क कितपत सुरक्षित आहे याची आपल्याला
खात्री नसते. अशा असुरक्षित असणाऱ्या नेटवर्कवरून, आपल्या डिव्हाईस वरच्या फाईल्समधील
माहितीवर इतर कोणाचीही नजर असू शकते हे
लक्षात घ्यायला हवे. म्ह्णूनच बँके
अकाउंटशी निगडीत माहिती जसे नम्बर, पासवर्ड आपल्या डिव्हाईस वर कधीही सेव्ह करायची नसते. तसेच आर्थिक व्यवहार करताना
लागणारे पासवर्ड आपण नियमितपणे बदलत रहावे
म्हणजे अशा डेटाचोरी करणाऱ्यांचे काम अवघड होऊन जाते. डिव्हाईसचाही पासवर्ड किंवा अनलॉक पॅटर्न हा देखील
जाहीररीत्या वापरू नये. तसेच आपण केलेल्या सर्व ऑनलाईन पेमेंटची आपण नोंद केली
पाहिजे आणि जेव्हा आपल्या बँकेचे मासिक स्टेटमेंट येते तेव्हा त्यात ह्या नोंदी
पडताळून पाहायला हव्यात आणि त्यात काही तफावत आढळल्यास त्वरित आपल्या बँकेमध्ये
तसे कळवायलाही हवे !
राधा: बाबा, खरच किती महत्वाचे आहे हे !! आम्हा मुलांच्या हातातही किती वेळा फोन
असतो. तेव्हा आम्हाला ही माहिती असणे जरुरीचं आहे. ऑनलाईन पेमेंट अँप्लिकेशनच्या
जाहिरातीत लहान मुलांना काम करताना पाहून आम्हा मुलांना हे सगळे खूपच सोपे आणि सहज
वाटत होते. पण आपली आर्थिक सुरक्षा अशा
प्रकारे धोक्यात येऊ शकते हे तर आताच समजले !!
बाबा : छान !! टेकनॉलॉजीचा
वापर हा फक्त स्मार्ट नाही तर सेफ ही असायला हवा !! ह्या गोष्टींची काळजी नक्की
घेत जा आता !!
एवढ्यात दारातून आईने घरी आल्याची वर्दी दिली !! तेव्हा आनंदून राधा
म्हणाली, " बाबा आता पोटासाठी काळ ना
मॅगीचा ना स्वीगीचा ...झाला आता
सुगीचा " !! तिच्या या हजरजबाबीपणावर बाबांनी तिला टाळी दिली !!
-
रुपाली दीपक कुलकर्णी,
SWS फायनान्शिअल
सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक,
मोबाईल
क्रमांक: ९०११८९६६८१