Thursday, June 18, 2020

आरोग्य विमा : अनुभव : - श्री. निखिल हरकारे



लॉकडाऊन कालावधीमध्येमध्ये माझ्या आर्थिक सल्लागार असणाऱ्या  मित्राचा फोन आला.  सतत  लांबच -लांब चालणाऱ्या वेबिनार्स मुले  फोन स्पीकरवर टाकण्याची सवयच लागून गेली होती.  टाकला फोन स्पीकरवर ! मित्र  माझा पक्का हितचिंतक.  त्याने लगेच विचारले, "काय रे निखिल, तुझा व कुटुंबाचा आरोग्य विमा केलेला आहे का?".  लगेच आमच्या सौ.च्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह  उमटले. "हा प्रकार  काय असतो?", ( काय करणार? बहुतेक  भारतीय पुरुष,  महिलांना उंबऱ्याच्या पलीकडचे जग पाहूच देत नाही. तेव्हा ह्या माहिती असाव्या अशा महत्वाच्या गोष्टी किंवा त्यातील बारकावे  त्यांना माहीतच  नसतात.)  मित्राला सांगावे  "केला आहे आरोग्य विमा",  तर सौ. ने प्रश्नांचा भडीमार केला असता व मित्राला नाही म्हणावे तर ह्या माझ्या हितेषु मित्राने मला योग्य विमा  काढायला लावला असता.  सुटकाच नव्हतीच.   इकडे आड, तिकडे विहीर !  लॉकडाऊन मध्ये माझी  लॉकडइन परिस्थिती. शेवटी सौं. ला  शेजारी  बसायला लावून कपाटातून कागदपत्रे देऊन आलो.  प्रथमच पेन्सिलने कागदावर लिहून सांगितले की, 'फोन चालू असेपर्यंत काहीच बोलू नको, पण लक्ष देऊन ऐक'.  प्रथम मित्राला , मी केलेल्या आरोग्य विम्याची माहिती दिली दिली व त्याला त्या विमा कव्हर अंतर्गत,  COVID -19 साठी संरक्षण आहे का, याची खात्री करायला लावली. मग त्याने लगेचच  चौकशी केरून असे कव्हर  माझ्या पॉलिसीमध्ये अंतर्गत असल्याचे स्पष्ट केले. त्याने हेही सांगितले की पॉलिसी काढल्यानांतर, ३० दिवसांच्या कालावधीनंतरच   व्हायरल-डिसीजेस साठीचे बेनेफीट उपलब्ध  होतात. माझी विमा पॉलिसी जुनीच असल्याने मी सुटकेचा निःश्वास टाकला आणि माझ्या मित्राला मनोमन धन्यवाद दिले.    

या सगळ्यानंतर मात्र प्रकर्षाने मला जाणवले की आपण अर्थार्जनाच्या  रुटीनमध्ये आयुष्याकडे, परिवाराकडे, आपल्या व त्यांच्या स्वास्थ्याकडे किती दुर्लक्ष करित असतो किंवा गोष्टी गृहीत धरत असतो. अचानक येणारे आजारपण, मोठे हॉस्पिटलायझेशन अशा  गोष्टी आपल्या मनावर मानसिक आघात तर करतात तसाच आर्थिक आघात सुद्धा करतात. या सर्वांचा परिणाम आपल्या आर्थिक नियोजनावर होत असतो. हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट यांविषयी सल्ले देणारे भरपूर जण असतात किंवा माध्यमे असतात. पण योग्य ठिकाणाहून, हितकारक सल्ला घेणे केव्हाही महत्त्वाचे ठरते.

"विमा, आर्थिक नियोजन किंवा ड्रीम  होम घेण्याचा असो तुमचा विचार  
SWS आहे साथीला, करा योग्य सल्ला घेण्याचा  निर्धार”!!!

- श्री.  निखिल हरकारे,
गृहकर्ज विभाग,
SWS.