Friday, December 24, 2021

अर्थ विनोद: इन्व्हेस्टमेंट्स अँड प्लॅन्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क




एके ठिकाणी शेअर बाजारातील गुंतवणूकीशी संबंधित कार्यक्रम सुरू होता....

त्या कार्यक्रमात...एक सुंदर तरुणी  उपस्थित होती.  तिला पाहून एक गुंतवणूक सल्लागार तिच्या प्रेमातच पडला. 

चहासाठीच्या ब्रेकमध्ये तो तिला लगेच भेटला. पाहताक्षणी ती आवडली असल्याचे सांगून त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. तो सल्लागारही तसा दिसायला वाईट नव्हता. पण, त्या कार्यक्रमात शिकल्याप्रमाणे तिने ही लग्नाची गुंतवणूक करण्याआधी कंपनीची माहिती नीट घ्यायचं ठरवलं !

माहिती घ्यायची....  म्हणून त्या तरुणीने त्या सल्लागाराला त्याच्या घरच्या परिस्थिती बद्द्ल विचारले.तो म्हणाला,  "खरं तर मी अत्यंत सामान्य माणूस आहे.पण,      काही महिन्यांतच मी श्रीमंत होईन!"

त्या तरुणीला आश्चर्य वाटलं. "हे कसं घडेल...?" तिनं विचारलं. 

तो तरुण म्हणाला. "आता तर मी अगदी सामान्य आहे, पण, आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले माझे वडील काही दिवसांचेच सोबती आहेत. ते गेले की, मी किमान तीस कोटी रुपये संपत्तीचा मालक होईन."

चहाचा ब्रेक संपता संपता, त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले. 

पुढे काही दिवस बोलणं, मॅसेजिंग होत राहीलं.

काही कामानिमित्त तो तरुण काही दिवस शहराबाहेर होता. तो परत आला आणि दार उघडतो, तो समोर तीच सुंदर तरुणी...!  तिनं दार उघडले होते. आता ती त्याच्या घरात होती, त्याची सावत्र आई म्हणून !! 

दोनच दिवसांपूर्वी तिनं त्या सल्लागार तरुणाच्या वडिलांशी रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते. धक्का बसलेल्या त्या तरुणाला त्या कार्यक्रमात सांगितलेली ती सुचना आठवली. "गुंतवणुकीपूर्वी स्वतःची माहिती देताना काळजी घ्या...!!"


"इन्व्हेस्टमेंट्स अँड प्लॅन्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क...! 

रीड ऑल डाॅक्युमेंटस् केअरफुली...!!"


                  😝😝😝

स्रोत : कायप्पा