भारतीय
डाक विभाग अर्थात India Post Office ने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय
कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. २९९ किंवा
३९९ रुपयांमध्ये ही नवीन विमा योजना (Post office Accident Insurance
Scheme) सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत १० लाख रुपयांचे विमा कवच प्रदान
करण्यात येणार आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये
या विमा योजना अंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. याचा अर्थ असा
की, तुम्हाला वर्षभरात एकदाच २९९ किंवा ३९९ रुपये भरायचे आहेत. त्या
बदल्यात तुम्हाला वर्ष भरासाठी सुमारे १० लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळणार आहे.
एक वर्षानंतर पुढील वर्षासाठी योजना सुरू ठेवण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन
नूतनीकरण करायचे आहे. त्यानंतर पुन्हा एक वर्षासाठी अपघात विमा संरक्षण प्रदान
करण्यात येईल.
वय वर्षे
18 ते 65 वर्षीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा
शॉक, फरशीवरून घसरून पडून मृत्यू, पाण्यात पडून मृत्यू यात कव्हर आहेत.
> विमा धारकास कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
> विमा योजना दवाखान्याचा खर्च करण्यासाठी 60 हजार रुपये प्रदान करण्यात येतात.
> या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना अंतर्गत विमाधारकाच्या किमान दोन या मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
> विमाधारकास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असेल तर दाखल केलेल्या दररोज १ हजार रुपये प्रति दिवस असे १० दिवसांपर्यंत देण्यात येतात.
> विमाधारकास OPD खर्च हा 30000 रुपये प्रदान करण्यात येतात.
> विमाधारकास पॅरालिसीस झाल्यास त्यास १० लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
> विमाधारक व्यक्तीचा कुटुंबास दवाखानात प्रवासासाठी प्रवास खर्च म्हणून २५,००० रुपये प्रदान करण्यात येतात.
२९९आणि ३९९ रुपयांच्या विमा पॉलिसीत काय आहे फरक?
पोस्ट ऑफिसअंतर्गत
२९९ व ३९९ रुपयांच्या अपघात विमा योजनेत काय फरक आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
एकच फरक आहे. ह्या सारख्याच आहे. ३९९ च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर
दोन मुलांना १ लाखांपर्यंतची मदतही शिक्षणासाठी मिळू शकते तर ही मदत २९९च्या अपघात
विमा योजनेत मिळणार नाही. त्याच प्रमाणे ३९९ योजनेत अंत्यसंस्कार खर्च, वाहतूक खर्च,शिक्षण
खर्च देण्यात येतो. हा खर्च २९९ योजनेत मिळत नाही.
पोस्ट ऑफिस
२९९आणि ३९९ रुपयांचा विमा योजना लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू
शकतात. विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँक असणे आवश्यक
आहे. ते नसल्यास तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधी काढून घ्यावे लागेल. यासाठी तुम्ही
पोस्टमन आणि पोस्ट ऑफिसातील कर्मचाऱ्यांची मदत घेऊ शकता.