Thursday, January 24, 2019

Events @ SWS, Muktangan : Dec 2018



१ डिसेम्बर २०१८: SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नासिक आणि मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने "वयम वाचक कट्टा" हा उपक्रम सुरु करण्यात आला. नासिक मधील बहुश्रुत  मनोचिकित्सक, श्री. शंतनु गुणे या वेळी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.  "बालवयात तसेच किशोरवयीन काळात वाचनाचे महत्व" या विषयावर उपस्थितांशी  त्यांनी संवाद साधला. आपले वैयक्तिक वाचन अनुभव, त्यामुळे बहरलेली अभिव्यक्ती यावर त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या.  आनंद निकेतन या नाशिकस्थित शाळेतील, "बहुरंगी बहर" ची उपविजेती ठरलेल्या कु. आभा गोकर्ण हिचा सत्कार यावेळी गुणे सरांच्या हस्ते करण्यात आला. 



8 Dec 2018: Conduction of "Wealth Creation" session by Mr. R. P. Adhikari at Mai Lele Shravan Vikas Vidyalaya, Nasik.



9 Dec 2018: Team SWS Strives for skill up-gradation to provide excellency in its services to the clients. The team completed full day workshop on "Advanced MS-Excel". The training was conducted by a Microsoft Certified Trainer Mr. Ashok Sindkar. 




१५ डिसेम्बर  २०१८: मुक्तांगण येथे  "वयम  वाचक कट्टा"  पुष्प दुसरे !! विशेष अतिथी : सौ. नीलिमा कुलकर्णी . बालवाचकांनी वाचन आणि भाषिक-गणिती खेळांचा आनंद घेतला.   



 १६ डिसेम्बर २०१८ :पवार तबला अकादमी,नाशिक आयोजित आणि एस.डब्ल्यू.एस.फा.सोल्युशन्स प्रा.लि.प्रस्तुत पं. भानुदास पवार स्मृती समारोह १६ डिसेम्बर २०१८ रोजी प.सा. नाट्यगृह येथे संपन्न झाला. या संगीत समारोहाचे हे २१ वे वर्ष होते. ग्यानसिंग नामधारी (लुधियाना) आणि सावनी तळवलकर-गाडगीळ(पुणे)  या प्रतिभासंपन्न आणि लोकप्रिय कलाकारांचे सादरीकरण हे यंदाच्या समारोहाचे वैशिष्ट्य होते . 


20-23 December 2018: SWS and Wayam Stall were showcased during Ankur Film Festival, Nasik.



27 Dec 2018: Conduction of "Wealth Creation" session by Mr. R. P. Adhikari at Jankalyan Blood Bank, Nasik.



२८ डिसेम्बर २०१८ : अशी अनेक मुले आहेत, जी वाचत नाहीत, कारण चांगले साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्या परिचयात अशा अनेक शाळा किंवा संस्था असतील, जेथील मुले चांगल्या साहित्यापासून वंचित रहात रहातात . अशा "वाचन-वंचित" मुलांपर्यंतही चांगले, सकस, दर्जेदार साहित्य का पोहोचू नये, असा विचार करून  “विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प , पिंपळद , तालुका त्रिंबकेश्वर , जिल्हा नासिक” येथे SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नासिक आणि मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने "वयम वाचक  कट्टा" हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  ह्या केंद्रामध्ये,  त्रिंबकेश्वर तालुक्याच्या आसपासच्या शाळांमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींचे वसतिगृह आहे.  दिनांक २८ डिसेम्बर २०१८ रोजी ह्या वाचन कट्ट्याचे उदघाटन झाले.   




अशा प्रकारे, डिसेम्बर २०१८ मध्ये ,  व्यवसायाबरोबरच सांगितीक , साहित्यिक आणि सामाजिक क्ष्रेत्रात SWS आणि मुक्तांगण यांनी  योगदान दिले !!