सप्रेम
नमस्कार ! कोविड
च्या या दुसऱ्या त्सुनामीत
आपण आणि आपला परिवार स्वस्थ असाल अशी आशा आहे !
पत्रास कारण की ... कोविड
कालावधीमध्ये, आपल्या आजूबाजूची परिस्थिती कठीण आणि खडतर आहे. सध्या वयाचा आणि आजाराचा तितकासा काही संबंध राहिलेला नाही. कधी, कोणाला, काय होईल काही याची शाश्वती नाही. कोविडच्या
दुसऱ्या लाटेत SWS च्या ग्राहक वर्गापैकी अनेक जण किंवा त्यांचे
प्रियजन यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य आणि जीवन विम्याचे महत्व अनन्य साधारण आहे. तेव्हा विमा पॉलिसीच्या बाबतीत, आपण वेळीच सजग व्हावे म्हणून हा पत्र प्रपंच !
आपण सर्वांनी, नेहेमीच आणि विशेष करून येणाऱ्या वर्षभराच्या कालावधीत, आपल्या विमा पॉलिसीच्या हफ्त्यांच्या बाबतीत विशेष दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. कोविडमुळे जे मृत्यू होत आहेत, त्या संबंधीत मृत्यू दावा (Death Claim) मिळवतांना अडचणी येत आहेत. अनुभवाअंती असे लक्षात येते आहे की कुटुंबियांची आर्थिक सुरक्षितता म्हणून ज्या विमा पॉलिसी काढलेल्या आहेत, त्यांचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. तेव्हा आपल्याकडील सर्व आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसींची एकत्रितपणे नोंद ठेवणे आणि त्याची विस्तृत माहिती आपल्या कुटुंबियांना देणेही आवश्यक आहे. तसेच या सर्व पॉलिसींचे हप्ते काळजीपूर्वक, वेळच्यावेळी भरणे अत्यावश्यक आहे जेणेकरून ज्या हेतूने आपण विमा पॉलिसी काढत असतो तशीच परिस्थिती उद्भवली तर विमा पॉलिसीचा नियोजित उपयोग आपल्याला व आपल्या कुटुंबियांना होऊ शकतो.
आपण घेतलेल्या सर्व पॉलिसींचा आढावा (Audit / Review) घेऊन वेळोवेळी आपल्या कुटुंबाच्या गरजेनुसार, आपल्या उत्पन्नाप्रमाणे व देयतेनुसार (Liabilities) विमा
संरक्षणात बदल
करणे अत्यावश्यक आहे. आपल्याला जर असे
Insurance Audit करावयाचे
असेल तर आपण नक्कीच
आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही आपणास उपयुक्त, मार्गदर्शक गोष्टी सुचवू शकतो.
आपण
आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करून त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो . त्याचाच एक भाग म्हणून
आपले विमा हप्तेही वेळेत भरणे हे आपले आद्य
कर्तव्य आहे. आजुबाजुला घडणारे प्रसंग
डोळसपणे पाहुयात आणि आपल्या
कुटुंबियांना आपल्या घरातील सदस्यांच्या विमा संरक्षणाची पूर्ण
माहिती देऊयात.
धन्यवाद
!!
- टीम sws