SWS अर्थवाणी - चरण ३: ब्लु-बुक (Blue Book ) 📘
अल्पारंभाने घेतले हाती,
अर्थ साक्षरता अभियान 👩🏫,
त्याद्वारे हे आवाहन,
जनहितार्थ जारी 😇 ।। १ ।।
ज्यांच्यासाठी करिता आपण,
सदैव कष्टाने अर्थार्जन 💰,
ते आपले कुटुंबीय, प्रियजन,
यांनाही द्यावे अर्थज्ञान ।। २।।
कुटुंबाचे आर्थिक चित्र 📈,
जे दावितसे अचुक ✅,
ते वापरावे ब्लु-बुक 📘
पहिली जबाबदारी ।। ३ ।।
अशा सर्व आर्थिक घडामोडी,
ज्या वसविती कौटुंबिक वित्तीय घडी,
त्यांची माहिती घरात देण्याची गोडी,
लावावी सत्वर 😇 ।। ४ ।।
ब्लु बुक मध्ये नोंदवावी हातोहातीं,
पोस्टल आणि बचत खाती,
गुंतवणूक आणि शेअर्सची माहिती,
प्रियजनांसाठी 👨👩👦👦 ।। ५ ।।
विमा जो अपघाती,आरोग्य अन जीवन,
स्थावर मालमत्ता आणि कर्जाऊ दिलेले धन,
लॉकर्स आणि येणारे इतर उत्पन्न 💰,
ब्लु-बुक द्वारे जाणती प्रियजन ।। ६ ।।
कर्जे, देणगी आणि आयकर 📉,
संबंधित कागदपत्रे तसेच सल्लागार,
यासंबंधी असावेत साक्षर,
तुमचे कुटुंबीय 👨👩👦👦।। ७ ।।
कर्मचारी लाभ आणि वित्तीय सुविधा,
नोंदवा ब्लु-बुकमध्ये विना दुविधा ✅,
ईच्छापत्र नोंदीद्वारे टाळा संभाव्य आर्थिक बाधा,
कुटुंबियांसाठी ☺️।। ८ ।।
जीवन आपुले असे क्षणभंगुर,
तेव्हा करावे कुटुंबियांस अर्थ साक्षर,
अल्पारंभाने केला हाच विचार 😎 ,
अर्थ साक्षरता अभियानाद्वारे ।। ९ ।।
ब्लु-बुक निर्मिले ह्याच हेतुसाठी ,
त्याचा लाभ घ्यावा कुटुंबियांसाठी,
आर्थिक सल्ला हा देण्यासाठी,
ही SWS अर्थवाणी 😇।। १० ।।
- डॉ. रुपाली कुलकर्णी,
ट्रेनिंग हेड,
SWS