SWS अर्थवाणी - चरण ४: आर्थिक नियोजन (Financial Planning )
स्वप्ने सर्वच बघतो आपण,
स्वतःसाठी अन कटुंबासाठीपण,
ती प्रत्यक्षात आणण्यासाठी,
अर्थ नियोजन असावे गाठी ।। १ ।।
महत्वपुर्ण टप्पे जीवनातील,
जन्म, संगोपन अन शिक्षणातील,
विवाह आणि स्वप्नातले घर,
स्वप्ने ही तर अनमोल खरोखर ।। २ ।।
करावया अशी स्वप्ने साकार,
असावा आर्थिक सल्लागार,
जाणतो जो कुटुंबास बेहत्तर,
आणि मदत करण्या असे तत्पर ।।३।।
वित्तीय माहिती आणि गणिते,
सर्व सांगावी न राखिता गुपिते,
कार्य निवृत्ती आणि आर्थिक दायित्वे,
सरल होती सल्लागाराच्या मते ।। ४ ।।
अनुभव, ज्ञान आणि कार्य तत्परता,
गुणी अर्थ-सल्लागार असा नेमता,
तुमच्या ध्येयांप्रति जो घेई दक्षता,
इच्छापूर्ती होतील बघता बघता ।। ५ ।।
नियोजन होई जितक्या लवकर,
चक्रवाढी परिणाम मिळे सत्वर,
ध्येयांप्रति जर तुम्ही जागरूक खरोखर,
तर अर्थ नियोजन करावे तत्पर ।। ६ ।।
स्वप्ने सत्यात उतरविण्या जीवनी,
द्यावे लक्ष अर्थ नियोजनी,
सर्वांसाठी होवो कल्याणी,
अशी ही SWS अर्थवाणी !!
- डॉ. रुपाली कुलकर्णी,
ट्रेनिंग हेड,
SWS