SWS अर्थवाणी - चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund )
आपत्कालीन परिस्थिती येते, 😞
दत्त म्ह्णून उभी रहाते, 😨
शारिरीक, मानसिक आणिक आर्थिक, 💰
पातळींवरती ताणून धरते
😖 ।। १ ।।
पूर, भूकंप.सुनामी, मृत्युसम,🆘
संकटे कधी येती नैसर्गिक,🌊
घडे चोरी, अपघात,आजारपण. 😷
होतो आपण अगदीच अगतिक 😟 ।। २ ।।
होतो
खर्च आपत्कालीन, 💰
गड्बडते आर्थिक नियोजन, 📉
विशेष हेतुस्तव जपलेली,
👨🎓
पुंजी खर्ची घालतो आपण
0⃣
।। ३ ।।
का न करावे थोडे नियोजन
? 🛄
आपत्कालीन निधी उभारून,
💰
सहा महिन्यांचे आपुले वेतन
, 💸
ठेवावे बाजूला सारून 💰।। ४ ।।
आजारपणी ठरतो सहाय्यक,
🩼
आरोग्य विमा तो उपकारक,🏥
रुग्नालयीण खर्चांची जावक,
💵
मग न वाटतसे जाचक 🙂।। ५ ।।
उत्पन्न बंद होई नोकरी
जाता,🥹
खर्चाना न तुम्ही थांबवू
शकता, 💸
बचत पुंजी संपे पाहता पाहता,
💰
टळे हे सर्व, योग्य नियोजन
करता ।। ६ ।। 📈
घर कर्त्याच्या मृत्यू
समयी,😔
आर्थिक संकटे दुःखदायी
,😣
आपत्कालीन निधी फलदायी,
💰
अशा प्रसंगी जरूर होई 🙂 ।। ७ ।।
न कोणाच्या येवो जीवनी,
😇
संकटदायी अशी कहाणी , 🙂
सर्वांसाठी होवो कल्याणी, 😇
अशी ही SWS अर्थवाणी
😇 ।। ८ ।।
- डॉ. रुपाली कुलकर्णी, ट्रेनिंग हेड, SWS