Friday, February 26, 2021

आर्थिक नियोजन कसे कराल...: श्री. संदीप कुलकर्णी, CA


 
आर्थिक नियोजन कसे कराल...???


१)  आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीजास्त 30% च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे.


2)  साधारण 30% रक्कम ही बँक सेव्हींग, कर्ज, देणी  इत्यादीसाठी आणि   


3) साधारण  30% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी गुंतवणुक केली पाहिजे.


४) आणि उरलेले फक्त १०% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी.


५) कमीतकमी पुढील ६ महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, 

किंवा व्यवसायात मंदि आली तरी ही त्यावर ६ महिने पुढील सोय होईस्तोपर्यंत आपले खर्च चालतील.


६) सेकंड होम ही इन्व्हेस्टमेंट नाही. सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च , 

आणि वाढती महागाई वगळून जास्तीजास्त ५% फायदा करून देऊ शकते.


७) ४५ वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर असू नयेत.मुलांचे उच्च शिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याचे प्लॅनिंग  आपल्या 30 व्या वयापासूनच व्हायला हवेत.


८) बँकेत पती-पत्नीचे Joint Account असणे अनिवार्य आहे.


९) आपली प्रॉपर्टी ही पती-पत्नी दोघांच्या नावे हवी, कारण As per legal act पती च्या मृत्यू नंतर पत्नी वारसदार असते आणि नंतर मुले.


१०) प्रत्येकाचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे. टर्म इन्शुरन्स असणे ही गरजेचे आहे, हेच पुढे तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार व संरक्षण देते.


११) कुठलेही इन्व्हेस्टमेंट चे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये. माझ्या मुला/मुलीच्या नावाने विमापॉलीसी, बँक फिक्स डिपॉझीट, पोष्ट गुंतवणुक अशी गुंतवणुक नको, कायम आपल्या नावावर विमा/ गुंतवणुक असावी.


१२) मेडिक्लेम हा अत्यंत गरजेचा आहे.


१३) जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त 1 लाख पर्यन्त रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते.उरलेले नुकसान आपले असते.


१४) तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत, पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून आयकर कमी करू शकतात. तुमचे उत्पन्न जास्त असो वा कमी असो, 

टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे लोन, हेच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते.


१५) सर्व फायनॅन्शियल कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा, याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा, जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फेमिली मेंबर्स ते योग्यप्रकारे वापरु शकतील.


१६) आपला प्रोग्रेस ग्राफ दर सहा महिन्यांनी चेक करा. कारण त्या ग्राफप्रमाणे आपली इन्व्हेस्टमेंट, व्यवसाय निर्णय बदलता येतात.


वाचा, विचार करा व पुन्हा वाचा  व आता निर्णय घ्या.

दिवसा मागून दिवस,वर्षा मागून वर्ष निर्णयाशिवाय कसे निघून जातात हे कळत नाही... .

आजच वरील १६ मुद्द्यांवर आधारीत उज्ज्वल व सुरक्षित भविष्यासाठी योग्य नियोजन करा...!

- साभार 

श्री. संदीप कुलकर्णी, CA