चेक
लिहितानांचा चेक !
राधा बाबांकडे येतांना, तिच्या बँक अकाउन्टचे चेक-बुक हातात घेऊन
येते.
राधा: बाबा, हे माझ्या बँक अकाउन्टचे चेक-बुक ! तुम्ही
म्हणाला होतात ना, की
यावेळी माझ्या शाळेतील व्हॅनच्या भरत
काकांना तू चेकने पैसे दे... तर मी हे घेऊन आले आहे. यातील "Pay" च्या ठिकाणी भरत-काकांचे नाव आणि
"Date" च्या
ठिकाणी तारीख लिहिता येईल मला. अंकी आणि अक्षरी रक्कमही समजते आहे मग आता लिहू का मी हा चेक ?
बाबा: वा राधा ! तुझ्या
लक्षात होते तर. आणि चेक लिहायला आपल्याला
जमायला हवे, असे तुला वाटले
त्याबद्दल तुझे कौतुक ! सांगतो, नीट बघ. चेक वर "Pay" हे फिल्ड आहे. त्याच्यापुढे
आपल्याला कोणाला हे पेमेंट करावयाचे आहे म्हणजे व्यक्ती किंवा कंपनी, त्याचे नाव लिहितात. शिवाय चेकच्या वरच्या
डाव्या कोपऱ्यात दोन आडव्या रेघा मार.
म्हणजेच 'Crossed' चेकचा
वापर कर. असे केल्याने तो चेक फक्त भरत
काकांच्याच खात्यात भरला जाईल याची खात्री होइल. उद्या भरत-काकांना विचारून नावाची एकदा खात्री करून घे.
राधा: बाबा, भरत
काकांच्या नावे लिहिलेला चेक त्यांच्याच खात्यात भरला जाईल ना ! मग हे Crossed चेक प्रकरण कशासाठी?
बाबा:अग समजा, तू दिलेला आणि क्रॉस न केलेला चेक जर
काकांकडून हरवला आणि इतर कोणा लबाड व्यक्तीला तो सापडला तर अशी व्यक्ती बँकेच्या
काउंटरवरूनच, भरत
काकांचे नाव सांगून, रोख
रक्कम मिळवू शकते. म्हणून , योग्य
व्यक्तीच्या खात्यातच चेक जमा व्हावा म्हणून ही 'Crossed'
चेकची पद्धत. शिवाय तुझ्या बँक अकाउन्टमध्ये पुरेशी रक्कम
आहे ना याचीही खात्री आज करून घे.
राधा: हो बाबा. माझ्या
बँकेच्या अकाउन्टसाठी आईचा मोबाईल नम्बर रजिस्टर आहे. तेव्हा आईच्या
मोबाईलवरून कॉल करून, तिकडे
आता ३००० रु. जमा आहे हे मी माहीत करून घेतलेय .
आणि मला तर १००० रु. चा चेक लिहायचाय.
बाबा: शाब्बास राधा ! कोणालाही आपल्या अकाउन्टमधून चेकने पेमेंट करण्याआधी, अकाउन्टमध्ये पुरेशी रक्कम आहे ह्याची खातरजमा
करून घ्यायला हवी. अकाउन्टमध्ये पुरेशी
रक्कम नसताना, जास्तीच्या
रक्कमेचा चेक जर कोणी दिला आणि घेणाऱ्याने तो आपल्या अकाउन्टमध्ये जमा केला,
तर तो चेक प्रोसेस होऊ शकणार नाही म्हणजेच
"चेक बाऊन्स" होईल. आणि असे होणे हा दंडनीय अपराध आहे बरं का ! अशावेळी चेक घेणारा आणि देणारा याना बँक
आर्थिक दंड तर करतेच शिवाय चेक घेणाऱ्याने
जर तक्रार केली तर चेक देणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊंन अशा फसवणूकीसाठी त्याला दोन
वर्षे इतका तुरुंगवासही होऊ शकतो.
राधा: ओह, बापरे ! हे तर मला नव्हते माहीत बाबा. बरे
झाले मी माझ्या बँक अकाउन्टचा बॅलन्स आधीच चेक करून ठेवला होता. पण बाबा, तुम्ही सांगितली ती झाली चेक-बाऊन्सची बाब. पण समजा मी जर चुकून जास्तीच्या पेमेंटचा आकडा चेकवर लिहिला आणि तो चेक कोणाला
देऊन टाकला तर?
बाबा: राधा, असे करणे म्हणजेही चेक देणाऱ्याची चूकच झाली
ना ! अशावेळी तुम्ही तुमच्या बँकेला माहिती देऊन ,
तो चेक प्रोसेस न करणेबाबत सांगू शकता. याला म्हणतात "Stop Payment" केस. पण झालेल्या चुकीबद्दल,
तुम्हाला बँक आर्थिक दंड करू शकते. ही "Stop Payment" सुविधा, चेक देणारा व्यक्ती आर्थिक फसवणूक, झालेला करार संपणे,
चेक गहाळ होणे अशा वेळेही वापरू शकतो.
राधा: बाबा , चेक लिहिताना तर बऱ्याच गोष्टींची काळजी
घ्यायला हवी मग ! तुम्ही सांगलीतलेला 'चेक
लिहीतानांचा चेक' मी
आता लक्षात ठेवीन.
बाबा: Ok ! पळा आता,
मलाही ऑफिसलाही निघायचेय.
राधा आणि बाबा आपापल्या
कामास जातात.
डॉ. रुपाली कुलकर्णी,
- ट्रेनिंग हेड, SWS