Friday, December 31, 2021

Financial Jokes For Financial Folks


‘A woman proudly told her friend, “I’m responsible for making my husband a millionaire.” “Well what was he before he married you?” the friend asked. “A billionaire.”‘


😂😂😂

 A man entered in the Bank with a gun and 3 lakh rupees cash. On entering itself he shot a bullet in the air and shouted. "If someone tries to move from their seats and try to convince  me for any Investment plan or SIP  or Trading Account or RD or mutual fund...I'll start firing.. I came here just to deposit my money in my account." ....!! That's it!!

😂😂😂

‘Lying on his deathbed, the rich, miserly old man calls to his long-suffering wife. “I want to take all my money with me,” he tells her. “So promise me you’ll put it in the casket.”

After the man dies, his widow attends the memorial service with her best friend. Just before the undertaker closes the coffin, she places a small metal box inside.

Her friend looks at her in horror. “Surely,” she says, “you didn’t put the money in there.”

“I did promise him I would,” the widow answers. “So I got it all together, deposited every penny in my account, and wrote him a check. If he can cash it, he can spend it.”‘

 

😂😂😂

 


Friday, December 24, 2021

अर्थ विनोद: इन्व्हेस्टमेंट्स अँड प्लॅन्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क




एके ठिकाणी शेअर बाजारातील गुंतवणूकीशी संबंधित कार्यक्रम सुरू होता....

त्या कार्यक्रमात...एक सुंदर तरुणी  उपस्थित होती.  तिला पाहून एक गुंतवणूक सल्लागार तिच्या प्रेमातच पडला. 

चहासाठीच्या ब्रेकमध्ये तो तिला लगेच भेटला. पाहताक्षणी ती आवडली असल्याचे सांगून त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. तो सल्लागारही तसा दिसायला वाईट नव्हता. पण, त्या कार्यक्रमात शिकल्याप्रमाणे तिने ही लग्नाची गुंतवणूक करण्याआधी कंपनीची माहिती नीट घ्यायचं ठरवलं !

माहिती घ्यायची....  म्हणून त्या तरुणीने त्या सल्लागाराला त्याच्या घरच्या परिस्थिती बद्द्ल विचारले.तो म्हणाला,  "खरं तर मी अत्यंत सामान्य माणूस आहे.पण,      काही महिन्यांतच मी श्रीमंत होईन!"

त्या तरुणीला आश्चर्य वाटलं. "हे कसं घडेल...?" तिनं विचारलं. 

तो तरुण म्हणाला. "आता तर मी अगदी सामान्य आहे, पण, आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले माझे वडील काही दिवसांचेच सोबती आहेत. ते गेले की, मी किमान तीस कोटी रुपये संपत्तीचा मालक होईन."

चहाचा ब्रेक संपता संपता, त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले. 

पुढे काही दिवस बोलणं, मॅसेजिंग होत राहीलं.

काही कामानिमित्त तो तरुण काही दिवस शहराबाहेर होता. तो परत आला आणि दार उघडतो, तो समोर तीच सुंदर तरुणी...!  तिनं दार उघडले होते. आता ती त्याच्या घरात होती, त्याची सावत्र आई म्हणून !! 

दोनच दिवसांपूर्वी तिनं त्या सल्लागार तरुणाच्या वडिलांशी रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते. धक्का बसलेल्या त्या तरुणाला त्या कार्यक्रमात सांगितलेली ती सुचना आठवली. "गुंतवणुकीपूर्वी स्वतःची माहिती देताना काळजी घ्या...!!"


"इन्व्हेस्टमेंट्स अँड प्लॅन्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क...! 

रीड ऑल डाॅक्युमेंटस् केअरफुली...!!"


                  😝😝😝

स्रोत : कायप्पा  


Friday, December 3, 2021

आर्थिक स्थैर्यासाठी आर्थिक नियोजन


आर्थिक स्थैर्यासाठी आर्थिक नियोजन 

आर्थिक स्थैर्यासाठी तर आर्थिक नियोजन महत्त्वाचे असतेच.  आर्थिक नियोजनामुळे आयुष्यातील अनेक निर्णय आपण कोणत्याही परिस्थितीच्या दबावाखाली न येता शांतपणे घेऊ शकतो. आर्थिक नियोजन करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात ते पाहूया.

१. आर्थिक शिस्त लावून घ्या

आर्थिक व्यवहारांसंदर्भात शिस्त असणे खूप महत्त्वाचे असते. कारण अशी शिस्त असेल तरच दीर्घकालाचे नियोजन करता येते आणि त्याची अंमलबजावणी शक्य होते.

२. आर्थिक उद्दिष्टांची आखणी

आपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांची आखणी करा. असे केल्याने परिपूर्ण आर्थिक नियोजन करणे शक्य होईल.

३. नियमित बचत

आपल्या मासिक उत्पन्नाचा आणि खर्चाचा योग्य तो आढावा घ्या. अनावश्यक खर्च टाळत दरमहिन्याला बचत करा. ही बचतच भविष्यातील आपल्या समृद्धीची दारे उघडणार असते.

४. नियमित गुंतवणूक

संपत्ती निर्मतीसाठी नियमितपणे गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुदतठेवी, सोने, शेअर, म्युच्युअल फंड, बॉंड्स, पीपएफ, पोस्टाच्या योजना यासारख्या गुंतवणूक प्रकारात नियमित गुंतवणूक केली पाहिजे. 

५.  आपत्कालीन निधी

अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटासाठी वेगळी तरतूद करणे आवश्यक आहे. यालाच आपत्कालीन निधी म्हणतात. आपल्या मासिक उत्पन्नाच्या साधारण सहापट तरी हा निधी असावा. हा निधी लिक्विड फंडात किंवा बॅंकेच्या मुदतठेवीत ठेवावा. असे केल्यास दीर्घकालावधीसाठी केलेली गुंतवणूक मोडायची वेळ येत नाही.

६. विमा 

गुंतवणूक करतानाच आयुर्विमा आणि आरोग्यविमा घ्यायला विसरू नका. विमा हा आपल्या संरक्षणासाठी असतो. आपल्या वैद्यकीय खर्चासाठी आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी विमा अत्यंत आवश्यक आहे.

७.  जोखीम आणि परतावा

गुंतवणूक प्रकार निवडताना आपले वय, उत्पन्न, आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घ्या. त्यानुसार गुंतवणूक प्रकाराची विभागणी करा. तरुणवयात इक्विटीसारख्या जोखमीच्या प्रकारात अधिक गुंतवणूक करता येते. मात्र जसजसे वय वाढत जाते तसतसे डेट प्रकारात किंवा निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणूक प्रकारातील गुंतवणूक वाढवत नेली पाहिजे. 

८. आर्थिक सल्लागार

ही सर्व आखणी करताना आणि त्यावर अंमलबजावणी करताना आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरते. कारण ते या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. आपल्या गरजांनुरूप नियोजनाची आखणी ते करू शकतात. आपण ऐकीव माहितीच्या किंवा अपूर्ण ज्ञानाच्या जोरावर केलेले नियोजन आणि गुंतवणूक भविष्यात आपल्याला अडचणीची ठरू शकते किंवा त्यामुळे अपेक्षित लाभ मिळत नाही.



Friday, November 26, 2021

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

 

आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता.

२००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे. अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते. ‘बिटकॉइन’ या आद्य आभासी चलनाचे मूल्य तर आकाशाला गवसणी घालत आहे.  आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे.


भारतीय रुपयाच्या चौकटीत सांगायचे झाले तर एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास ३८ लाख ६१ हजार रुपये इतके आहे.‘बिटकॉइन’सारख्या सर्वच आभासी चलनांच्या घोडदौडीचे आणखी एक उदाहरण भारताच्याच अनुषंगाने देता येईल. २८ एप्रिल २०१९ रोजी एका बिटकॉइनचे मूल्य ३ लाख ६० हजार रुपये इतके होते. तेच मुल्य २८ मे २०१९ रोजी ६ लाख ६ हजार रुपयांवर पोहोचले. म्हणजेच, जर एखाद्याने एप्रिलमध्ये खरेदी केलेला एक बिटकॉइन मेमध्ये विकला तर महिनाभरात त्याला तब्बल तीन लाख रुपयांचा घसघशीत नफा कमवता आला असेल.

हिवाळी अधिवेशनामध्ये सध्या सत्तेत असणारं मोदी सरकार क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील एक विधेयक मांडणार आहे. या नवीन विधेयकानुसार भारतामध्ये सर्व खासगी आभासी चलनांवर बंदी घालण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बुधवारी म्हणजेच २४ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या सकाळच्या सत्रामध्ये अनेक मोठ्या क्रिप्टोकरन्सीजचा दर सरासरी १५ टक्क्यांनी घसरल्याचं पहायला मिळत आहे. बिटकॉनचा दर १७ टक्क्यांहून अधिक घसरलाय. तर इथेरियमच्या दरात १५ टक्क्यांहून अधिक घट झालीय. थिथेरचा दरही जवळजवळ १८ टक्क्यांनी घसरलाय.

-- (संदर्भ : लोकसत्ता )

Friday, November 19, 2021

SWS अर्थवाणी - चरण ४: आर्थिक नियोजन (Financial Planning )



SWS अर्थवाणी - चरण ४: आर्थिक नियोजन  (Financial Planning ) 

स्वप्ने सर्वच बघतो आपण,
स्वतःसाठी अन कटुंबासाठीपण,
ती प्रत्यक्षात आणण्यासाठी,
अर्थ नियोजन असावे गाठी  ।। १ ।।

महत्वपुर्ण टप्पे जीवनातील,
जन्म, संगोपन अन शिक्षणातील,
विवाह आणि स्वप्नातले घर,
स्वप्ने ही तर अनमोल खरोखर ।। २ ।।

करावया अशी स्वप्ने साकार,
असावा आर्थिक सल्लागार,
जाणतो जो कुटुंबास बेहत्तर,
आणि मदत करण्या असे तत्पर ।।३।।

वित्तीय माहिती आणि गणिते,
सर्व सांगावी न राखिता गुपिते,
कार्य निवृत्ती आणि आर्थिक दायित्वे,
सरल होती सल्लागाराच्या मते ।। ४ ।।

अनुभव, ज्ञान आणि कार्य तत्परता,
गुणी अर्थ-सल्लागार असा नेमता,
तुमच्या ध्येयांप्रति जो घेई दक्षता,
इच्छापूर्ती होतील बघता बघता ।। ५ ।।

नियोजन होई जितक्या लवकर,
चक्रवाढी परिणाम मिळे सत्वर,  
ध्येयांप्रति जर तुम्ही जागरूक खरोखर,
तर अर्थ नियोजन करावे तत्पर  ।। ६ ।।

स्वप्ने सत्यात उतरविण्या जीवनी,
द्यावे लक्ष अर्थ नियोजनी,
सर्वांसाठी होवो कल्याणी,  
अशी ही SWS अर्थवाणी  !! 

- डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड,

  SWS  



Friday, November 12, 2021

SWS अर्थवाणी - चरण ३: ब्लु-बुक (Blue Book ) 📘


 SWS अर्थवाणी - चरण ३: ब्लु-बुक (Blue Book ) 📘


अल्पारंभाने घेतले हाती,

अर्थ साक्षरता अभियान 👩‍🏫,

त्याद्वारे हे आवाहन,

जनहितार्थ जारी 😇 ।। १ ।। 


ज्यांच्यासाठी करिता आपण,

सदैव कष्टाने अर्थार्जन 💰,

ते आपले कुटुंबीय, प्रियजन,

यांनाही द्यावे अर्थज्ञान  ।। २।।


कुटुंबाचे आर्थिक चित्र 📈,

जे दावितसे अचुक ✅,

ते वापरावे ब्लु-बुक 📘

पहिली जबाबदारी  ।। ३ ।।


अशा सर्व आर्थिक घडामोडी,

ज्या वसविती कौटुंबिक वित्तीय घडी,       

त्यांची माहिती घरात देण्याची गोडी,

लावावी सत्वर 😇 ।। ४ ।। 


ब्लु बुक मध्ये नोंदवावी हातोहातीं,

पोस्टल आणि बचत खाती,

गुंतवणूक आणि शेअर्सची माहिती,

प्रियजनांसाठी 👨‍👩‍👦‍👦  ।। ५ ।।


विमा जो अपघाती,आरोग्य अन जीवन,

स्थावर मालमत्ता आणि कर्जाऊ दिलेले धन,

लॉकर्स आणि येणारे इतर उत्पन्न 💰,

ब्लु-बुक द्वारे जाणती प्रियजन ।। ६ ।।


कर्जे, देणगी आणि आयकर 📉,

संबंधित कागदपत्रे तसेच सल्लागार,

यासंबंधी असावेत साक्षर, 

तुमचे कुटुंबीय 👨‍👩‍👦‍👦।। ७ ।।


कर्मचारी लाभ आणि वित्तीय सुविधा,

नोंदवा ब्लु-बुकमध्ये विना दुविधा ✅,

ईच्छापत्र नोंदीद्वारे टाळा संभाव्य आर्थिक बाधा,

कुटुंबियांसाठी  ☺️।। ८ ।।


जीवन आपुले असे क्षणभंगुर,

तेव्हा करावे कुटुंबियांस अर्थ साक्षर,

अल्पारंभाने केला हाच विचार 😎 ,

अर्थ साक्षरता अभियानाद्वारे ।। ९ ।।


ब्लु-बुक निर्मिले ह्याच हेतुसाठी ,

त्याचा लाभ घ्यावा कुटुंबियांसाठी,

आर्थिक सल्ला हा देण्यासाठी,

ही SWS अर्थवाणी 😇।। १० ।।


- डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड,

  SWS  

Friday, October 29, 2021

ATM कार्ड अहस्तांतरणीय आहे...डोळ्यात अंजन घालणारा हा एक अनुभव !


बँकिंग नियम स्पष्टपणे सांगतात की एटीएम कार्ड अहस्तांतरणीय आहे आणि खातेदाराशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने त्याचा वापर करू नये इतरांचे डेबिट कार्ड वापरून  त्यांना (जोडीदाराला किंवा जवळच्या नातेवाईक/मित्राला) एटीएममधून पैसे काढू देण्याची प्रासंगिक कृती महागात पडू शकते.

 

वानगीदाखल एक किस्सा

नोव्हेंबर २०१३ रोजी  सौवंदना यांनी स्थानिक एसबीआय एटीएममधून २५,000 रुपये काढण्यासाठी तिचे पती राजेश कुमार यांना पिन असलेले डेबिट कार्ड दिले. राजेशने एटीएममध्ये जाऊन कार्ड स्वाइप केले; मशीनने पैसे डेबिट झाल्याचे दर्शविणारी स्लिप दिली, परंतु रक्कम मात्र दिली नाही. जेव्हा एटीएम मधून पैसे आले नाहीत, तेव्हा राजेशने एसबीआय कॉल सेंटरला कॉल केला की एटीएममध्ये बिघाड आहे आणि २४ तासांच्या आत पैसे खात्यात परत केले जातील असा दिलासा त्याना मिळाला . एक दिवसानंतरही पैसे मिळाल्याने, त्यांनी औपचारिक तक्रार घेऊन बँकेच्या शाखेत संपर्क साधला. परंतु या जोडप्याला मोठा धक्का बसला. एसबीआयने व्यवहार बरोबर असल्याचे सांगून आणि ग्राहकाला पैसे मिळाले असे सांगून काही दिवसांत हे प्रकरण बंद केले. यानंतर सौ वंदनाने नंतर  बेंगळुरू चतुर्थ अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचाशी संपर्क साधला आणि आरोप केला की SBI ने एटीएम व्यवहारात गमावलेले २५,000 रुपये परत करण्यात अयशस्वी ठरले. तिने सांगितले की तिला नुकतेच बाळंतपण झाले आहे आणि घराबाहेर जाऊ शकत नाही, म्हणून तिच्या वतीने तिच्या पतीला पैसे काढण्यास सांगावे लागले होते. या जोडप्याने सीसीटीव्ही फुटेज मिळवले ज्यामध्ये राजेश कुमार मशीन वापरत असल्याचे दिसून आले, परंतु रोख रक्कम दिली जात नाही. त्यांनी या आधारे पुढे बँकेकडे तक्रार केलीत्यानंतर तपास समितीने निर्णय दिला की वंदना, कार्डधारक फुटेजमध्ये दिसत नाही. ग्राहक मंचाकडे जाण्यापूर्वी, जोडप्याने बँक लोकपालाकडे अंतिम विनवणी केली ज्याने फक्त पिन शेअर केला, केस बंद असा निर्णय दिला. हा खटला साडेतीन वर्षे चालला. सौ वंदनाचे  म्हणणे होते  की, एसबीआयने एटीएममधील त्रुटीमुळे गमावलेले तिचे पैसे परत करावेत, परंतु एटीएम पिन इतर कोणाशी तरी शेअर करणे हे उल्लंघन आहे या नियमाचा हवाला देत बँकेने आपली बाजू मांडली. पुढे, बँकेने एटीएम व्यवहार यशस्वी आणि तांत्रिकदृष्ट्या बरोबर असल्याचे दाखवून लॉग रेकॉर्डसह कागदपत्रे तयार केली.२९ मे २०१८ रोजी दिलेल्या निकालात, न्यायालयाने निर्णय दिला की वंदनाने पिन सामायिक करण्याऐवजी आणि पैसे काढण्याऐवजी रु २५,000 रुपये काढण्यासाठी तिच्या पतीला सेल्फ-चेक किंवा अधिकृतता पत्र दिले पाहिजे. न्यायालयाने खटला फेटाळून लावला.

 

तेव्हा एटीएम कार्ड अहस्तांतरणीय आहे आणि खातेदाराशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने त्याचा वापर करू नये हेच खरे !! पिन शेअर करण्याच्या अंतिम परिणामांना उघड करणारे  हे उदाहरण बोलके आहे. ग्राहक म्ह्णून आपण जागरूक होऊयात आणि इतरानाही सजग करूयात !! 

(स्रोत : व्हाटसअँप )