Friday, November 30, 2018

शेअर्स , म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन पुंजीगत अधिलाभ कर : समस्या एक , समाधान अनेक : श्री. किशोर काळे






आटपाट
 नगर होतेत्या नगराच्या मध्यवर्ती भागात एक डेरेदार टोलेजंग असा वृक्ष होतात्याला रसाळसुमधुर अशी फळे लागतपरंतु त्या वृक्षाला मोठाले काटे होतेत्यामुळे अबालवृद्ध त्या वृक्षापासून चार हात लांबच असततरीही दूर परदेशातून येणार्या पक्षांच्या थव्यांनी तो वृक्ष नेहमी गजबजलेला असेआजूबाजूच्या  जंगलातील माकडेसुद्धा त्या झाडाची फळे खाण्यास आतुरलेली असतदिवसभर ती मर्कटे त्या झाडावर उच्छाद करीतनागरिक मात्र त्या वृक्षाचे मोठाले काटे पाहून त्या पासून दूरच राहत.

     एके दिवशी जंगलात तपश्चर्या करणारे साधू महाराज अचानक भिक्षेसाठी त्या नगरात आलेत्यांनी आपल्या तप:सामर्थ्याने त्या वृक्षाच्या सुमधुर फळांची महती जाणली  ती त्यांनी राजाला जाऊन सांगितलीते म्हणालेहे राजनजो काणी या वृक्षाच्या एका सुमधुर फळाला वर्षातून एकदा खाईल त्याला पूर्ण वर्षभर कोणतीही शारिरीक व्याधी होणार नाहीत्याच्या शरीराचा र्हास  होता पूर्ण वर्ष तो वार्धक्यापासून दूर राहीलहा हा म्हणता ही बातमी सगळ्या नगरात पसरलीमग काय आश्चर्य त्या झाडाची फळे तोडण्यासाठी नागरिकांची चढाओढ सुरू झालीज्या झाडाकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं त्या झाडावर चढायला मारामारी होऊ लागलीपरिस्थिती चिघळण्या अगोदर राजाने सौनिकांमार्फत ते झाड चहुबाजूंनी वेढून घेतले  फर्मान सोडलेज्या कोणाला ह्या वृक्षाचे एक फळ खायचे असेल त्याने आपल्या एक वर्षाच्या उत्पन्नातून 10% कर राजकोषात जमा करावाह्या घोषणेने नागरिक अचंबित झालेइतके दिवस ज्या झाडाची फळे अगदी सहज  फुकट उपलब्ध होती त्यासाठी आता उत्पन्नाच्या 10% इतकर कर द्यायचाबापरे अजबच संकट आहे.

     ज्या नागरिकांचा साधू महाराजांवर विश्वास होता ते सश्रद्ध लोक उत्पन्नाच्या 10% कर देऊन एक फळ घेण्यासाठी रांगेत उभे राहीले  उरलेले अश्रद्ध लोक मात्र त्या फळाच्या दैवी गुणांपासून वंचीत राहीले.

     मित्रांनोह्या गोष्टीचा जर रूपकात्मक विचार केला तर तुमच्या लक्षात येईल कीतो वृक्ष म्हणजे आपला शेअर बाजारत्याची फळे म्हणजे मिळणारा भरघोस परतावात्याचे मोठे बोचरे काटे म्हणजे बाजारातील चढउतारत्यावरील पक्षी म्हणजे परदेशी गुंतवणूकदारमाकडे आपल्या देशातील केवळ 3% गुंतवणूकदारसाधू महाराज म्हणजे सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागारराजा म्हणजे आपले सरकार  10% कर म्हणजे सध्या बहुचर्चित असलेला दीर्घकालीन पुंजिगत अधिलाभ कर

(Long  Term Capital Gain Tax) (LTCG)

     सर्वसामान्य गुंतवणूकदार ह्या नवीन करामुळे भांबाऊन गेलायपरंतु गुंतवणूकीच्या सर्व उपलब्ध पर्यायांपैकीदीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात सक्षम असा पर्याय म्हणजे योग्य वापरातयोग्य वेळी केलेली दीर्घकालीन मुदतीची गुंतवणूकम्हणूनच दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी शेअर बाजाराशिवाय उत्तम पर्याय नाहीही बाब आता भरतीय जनतेला पटत असून त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणकीचा ओघ वाढला असूनम्युच्युअल फंड योजना  विमा योजना यांच्यामुळे त्यात अधिकच भर पडत आहेया वाढत्या गुंतवणुकीमुळे शेअर बाजार निर्देशांक सध्या नवीन उच्चांक गाठत असूनत्या वाढत्या गुंतवणुकीचा फायदा सरकारला सुद्धा व्हावा म्हणूनच 10% दीर्घकालीन पुंजिकृत अधिलाभ कर  (LTCG Tax) लावण्यात आलेला आहे.

     आता गुंतवणूकदारांकडे ह्या नव्या करांचे नियोजन करण्यासाठी कोणते पर्याय आहेत  हे पाहू.

पर्याय क्रमांक 1

     सध्याच्या व्यवस्थेत हा कर नवा असला तरी अगदीच नवखा नाहीशेअर्स वर सप्टेबर 2004 च्या पुर्वी असा कर अस्तित्वात होता, 2004 नंतरच्या काळात हा कर पूर्णपणे रद्द करण्यात आलात्याचा हेतू गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडे आकर्षित करणे हाच होतानजीकच्या काळात बाजारात येणार्या पैशाच्या वाढत्या ओघामुळे सरकारने शेअर्स  म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर कमावलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10% इतका कर पुन्हा लावण्यात आला आहेह्यात काळजीचे काहीच कारण नाही कारण हा कर केवळ कमावलेल्या नफ्यावरच आकारला जाणार आहेतोही केवळ 10% इतकाचआता कराला कमीत कमी जर करायचे असेल तर वॉरेन बफेट यांच्या तत्त्वानुसार योग्य शेअर घ्या  घट्ट धरून बसा  (Buy Right Sit Tight) अशी दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास आपल्याला आपले भांडवल अनेक पटींनी वाढवता तर येईलच  ह्या कराला आपल्या गुंतवणुकीपासून दूर सुद्धा ठेवता येईलथोडक्यात ह्या कराला तुम्ही पोस्टपोन करू शकाल.

     म्युच्युअल फंडाच्या लाभांशावर देखील 10% कर नव्याने लादला असून ह्या मुळे आता म्युच्युअल फंडाच्या डिव्हीडेंड ऑप्शन स्कीमपेक्षा ग्रोथ ऑप्शन स्कीम्समध्ये निवेश करणे फायद्याचे ठरेलअनेक बँक कर्मचारी  काही म्युच्युअल फंड वितरक बँकांचे व्याज दर कमी झाल्यामुळे फिक्स्ड् डिपॉजिटमध्ये गुंतवणूक करण्यात आलेल्या गुंतवणूकदारास महिना 1% लाभांशाचे आमिश दाखवत बॅलन्स फंडाच्या डिविडंड ऑप्शनमध्ये गुंतवणूक करण्यास भरीस पाडत आहेतसध्या बॅलन्स फंडानी 7% ते 75% इतकी गुंतवणूक शेअर्समध्ये केलेली आहेत्यामुळे ते धोक्याच्या उच्चतम पातळीवर आहेत  भाबडे गुंतवणूकदार या धोक्यापासून बेसावध असून त्यांना या चुकीच्या विक्री तंत्राचा फटका पडू शकेलया विचित्र परिस्थितीतून सावरण्यासाठी  लाभांशावरील कर वाचवण्यासाठी डिविडंड ऑप्शन मधून ग्रोथ ऑप्शनमध्ये येणे क्रमप्राप्त होणार आहे.

     दीर्घकालीन गुंतवणूक करताना बाजारातील उद्योगांना चांगले समजून घेऊन त्यावर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहेजर आपल्याकडे ही समज  वेळ नसेल तर हे काम चांगल्या सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागाराच्या हाताने देणे केव्हाही श्रेयस्कर

     शेवटी कान हे सोनारानेच टोचलेले बरेनाही का?

 

पर्याय क्रमांक 2

     दीर्घकालीन गुंतवणूक जरी फायद्याची असली तरी योग्य मालमत्तेचे नियोजन  (Asset Allovation) केल्याशिवाय गुंतवणूक करणे सोयीचे नाहीया नवीन कर प्रणालीमध्ये गुंतवणूकदारास शेअर्स  इक्विटी म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन कॅपिटल गेनवर दरवर्षी 1 लाख रूपयाची सूट देण्यात आलेली आहेयामुळे जर आपण दरवर्षी आपल्या एकूण ईक्विटी नफ्यातून 1 लाख इतका नफा जर डेट फंडामध्ये जमा करीत राहिली तर आपसूकच असेट अलोकेशन होईल  आपला नफा वळत करून घेता येईलफक्त हे करीत असताना ही सूट आपल्या संपूर्ण गुंतवणूकीवर एकत्रितपणे घ्यावी लागेल.

     अनेकदा गुंतवणूकदार आपली गुंतवणूक वेगवेगळ्या मध्यस्थ्या  (Distributors) मार्फत गुंतवत असतातत्यामुळे त्यांना एकत्रितपणे नफा ठरविणे कठीण जाईल  ही सूट घेताना चुक होऊ शकेलयावर उपाय म्हणजे चांगल्या निष्णात सेबी अधिकृत सल्लागाराकडे आपली संपूर्ण गुंतवणूक सोपविणे  त्याची फी देऊन त्याच्याकडून (Direct NAV) चा लाभ घेणेज्यामुळे गुंतवणूकीच्या खर्चात जवळ जवळ 1% ते 1.25% इतकी बचत होऊन जास्त परतावा मिळेल.

 

पर्याय क्रमांक 3 :

     नव्या करप्रणालीत 10% (Long Term Capital Gain) हा कर जरी लागलेला असला तरी त्याचा मोठा बाऊ करण्याची काही गरज नाहीअर्थ मंत्र्यांच्या मते भारतात केवळ 3% लोक शेअर बाजार  म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतातहेच लोक शेअर बाजारातील उद्योगांवर मालकी हक्क प्रस्थापित करतातत्यामुळे त्यांना भरपूर नफा कमविता येतोह्या नफ्यावर जर 10% कर लावला तर त्यात अन्याय तो कोणताखरंतर हे आधी कमवा  मग द्या असाच आहे नाही का.

    

 

शहाण्या गुंतवणूकदाराने या नव्या कराचा बाऊ  करता केवळ योग्य मालमत्ता वाटप (Asset Allocation) करून  येणारा कर जर शांतपणे भरून टाकला तर त्याला कोणतीही काळजी करण्याचे कारणच नाहीत्याच प्रमाणे आपल्या एकूण नफ्यात वाढ करण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या (Direct Plans) मध्ये सेबी अधिकृत सल्लागाराच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक करावी  त्यालाच योग्य फी देऊन गुंतवणुकीवर देखरेख करून योग्य (Asset Allocation) करण्यास नेमावेयामुळे त्यांची गुंतवणूक योग्य रीतीने वाढून भविष्यात चांगला परतावासुद्धा मिळेलम्हणतात ना उद्योगाचे घरी लक्ष्मी नांदे परोपरीपरंतु ज्यांना हे समजून उमजून करता येणार नाही त्यांचे भविष्यात नुकसान होऊ शकेलआणि त्यांना हेच म्हणावे लागेल की अडाण्याची मोळी अन् भलत्यालाच मिळी.

                                                                                                                    श्री .किशोर काळे,

                                                                                                                गुंतवणुक सल्लागार,

                                                                                                                 प्रमुख : मुंबई शाखा, 

SWS FSPL 

 

 

 

Friday, November 23, 2018

पॅन कार्ड चे महत्व: श्री. ऋषभ सोनवणे



पॅन कार्ड म्हणजे पर्मनंट अकाउंट नंबर. पॅन क्रमांक म्हणजे भारतीय नागरिकाची ओळख. यात दहा आकडी क्रमांकामध्ये अक्षरे व अंकांची जळवणुक असते. भारतीय आयकर कायदा 1961, अंतर्गत सर्व भारतीयांना पॅन आयकर विभाग देतो. यासाठी केंद्रीय कर मंडळांतर्गत तरतूद आहे. भारतीयांप्रमाणे परदेशी नागरिकांना ही दिले जाते. पण त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.आर्थिक व्यवहार करताना असणे गरजेचे आहे प्रत्येक व्यक्तीचे केवळ त्याच व्यक्तीची ओळख असते.

पॅनकार्डचा उपयोग हा विविध ठिकाणी केला जातो.आयकर विवरण (रिटर्न) भरताना,टीडीएस दाखवताना, टीडीएस चा परतावा मागताना,आयकर विभागाबरोबर कोणताही पत्रव्यवहार करताना तसेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना पॅन कार्ड गरजेचे आहे. बँक खाते उघडायचे झाल्यास, टेलिफोनची नवीन जोडणी हवी असल्यास,मोबाईल नंबर हवा असल्यास, परकीय चलन खरेदी करताना किंवा पन्नास हजारापेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवताना वा काढताना, नवे वाहन खरेदी करताना इत्यादी व्यवहारांसाठी पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.


तुम्हाला पॅन कार्ड नसल्यामुळे व त्याचा गैरवापर झाल्यामुळे झालेल्या मानसिक,  शारीरिक तसेच आर्थिक त्रासाबाबत माझा अनुभव सांगतो.

नाशिक शहरात सत्तर ते ऐंशीच्या दशकात एक प्रसिद्ध वकील होऊन गेले. त्यांच्या कुटुंबात ते, त्यांची पत्नी व दोन मुले असा छोटासा परिवार होता.त्यांची व त्यांच्या पत्नी, या  दोघांची बँकेत फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक होती. दोघेजण आर्थिकदृष्ट्या साक्षर असल्यामुळे त्यांनी आपल्या गुंतवणुकीला वारस नमूद केला होता. त्यांच्या पत्नीने दुसऱ्या मुलाला त्यांच्या गुंतवणुकीला वारस म्हणून नमूद केले होते. परंतु मुलगा उच्च शिक्षणाच्या देशाने परदेशी गेला व तो तिथे स्थायिक झाला. आईवडिलांबरोबरचे  संबंध मुलाने जोपासले परंतु त्याचा भारतातील व्यवहारांशी  काहीही संबंध नव्हता.कालांतराने या दाम्पत्याचे निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर, त्या गुंतवणूकीबद्दल काय करायचे असा प्रश्न बँकेसमोर जेव्हा उभा राहिला तेव्हा त्यांनी त्यांचे वारस असलेल्या त्यांच्या मुलाला संपर्क साधला व गुंतवणुकीवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांना काही कालावधीत  आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कळविले. त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये पॅनकार्ड सर्वात महत्वाचे होते. परंतु शिक्षणासाठी परदेशी गेल्यानंतर, त्या मुलाचा भारतात आर्थिक व्यवहारांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. त्यामुळे पॅनकार्ड काढले गेले नव्हते. आर्थिक गुंतवणुकीचा  वारसा हक्क सांगण्यासाठी त्यांनी बँकेसमोर विविध कागदपत्रे सादर केली. परंतु बँकेच्या नियमानुसार पॅन कार्ड महत्त्वाचे होते. तेव्हा त्यांनी याबाबत एस. डब्ल्यू. एस. कडे विचारणा केली असता आम्ही त्यांना त्वरित होकार देत त्यांना पॅन कार्ड कसे मिळवून देता येईल याबाबत तपास सुरू केला. त्यातून आम्हाला अनिवासी भारतीयांसाठी पॅन कार्ड कसे उपलब्ध करता येईल याबद्दल माहिती मिळवली. त्यासाठी आवश्यक ती अर्ज व कागदपत्रे यांची यादी आम्ही ई-मेल द्वारे ग्राहकाला (मुलाला) कळवली. त्यांनी त्या अर्जांवर व कागदपत्रांवर सही करून ती कुरिअरने भारतात आम्हाला पाठवली.ती आम्ही भारतातील पॅनकार्ड विभागाकडे सुपूर्त केली. त्यांनी सर्व माहिती बरोबर आहे याची पडताळणी  केली. त्यांना 21 दिवसांनंतर त्यांच्या भारतीय पत्त्यावर पॅन कार्डचे कुरियर आले. ते त्यांनी बँकेत सुपूर्त करून बँकेच्या नियमांची पूर्तता केली व बँकेने त्यांना गुंतवणुकीवरील हक्क दिला.

आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात या गोष्टी कमी वेळात व सहजगत्या उपलब्ध होऊ शकल्या नाही तर त्यांच्या गुंतवणुकीचा फायदा त्यांना वा त्यांच्या वारसांना झाला नसता. आर्थिकदृष्ट्या साक्षर असणाऱ्या व्यक्तीने पॅन कार्ड हे लवकरात लवकर काढणे गरजेचे आहे. या एका कागदपत्रामुळे भविष्यातील शारीरिक/ मानसिक त्रासातून सुटका होते. नाही का...???

- श्री. ऋषभ सोनवणे 
गुंतवणुक  सल्लागार
S.W.S.F.S.P.L.


Wednesday, November 21, 2018

आर्थिक नियोजन: Financial Planning


बोली भाषेतअर्थम्हणजे पैसा. असं म्हणतात कीअर्थअसेल तर जीवनाला अर्थ आहे. पैशाचं जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात उदरनिर्वाहासाठी प्रत्येकजण काहींना काही उद्योग करत असतो. सर्वसाधारणपणे काही पैसे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावा लागतो तर उरलेला पैसा हा गुंतवणुकीसाठी ठेवला जातो. आपल्याकडे बऱ्याचदा पैसे कमावण्यासाठी जेवढे महत्व दिले जाते तेवढे त्याचे व्यवस्थापन/नियोजन (Financial Planning) करण्यास दिले जात नाही. त्याकडे आपण कानाडोळा करतो. नेहमीच डोळसपणे केलेली गुंतवणूक हि किफायतशीर ठरते. अनेकांना याची, म्हणजे "अर्थ नियोजनाची" (Financial Planning) जाणीवसुद्धा नसते. बँके मधील मुदतठेवी, पोष्टातल्या योजना किंवा विमा गुंतवणूक यापलीकडे बऱ्याच लोकांना काहीही माहित नसते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्थसाक्षरतेचा (Financial Literacy) अभाव असणे होय. आज आर्थिक नियोजना विषयी (Financial Planning) अधिक जाणून घेऊयात.  

उपलब्ध साधन संपत्तीचे, आयुष्यातील प्रत्येक गरजेकरता / उद्दिष्टयां करिता , विवेकाने सुनियोजन करून संपत्तीमध्ये वाढ करणे (आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे) म्हणजे अर्थनियोजन होय.

आर्थिक नियोजनातील महत्वाचे घटक खालील प्रमाणे असतात :

  १. सध्याचे वय – Today’s Age
  २. आयुष्यात तुमच्या आर्थिक अपेक्षा काय आहेत याबाबत स्पष्टता – Financial Goals
  ३. सद्य आर्थिक स्थिती – Current Financial Position
  ४. नियोजनाचा कालावधी – Term of Financial Planning
  ५. काटेकोरपणे अंमलबजावणी – Implementation 
  ६. मूल्यमापन – Monitoring and Evaluation
  ७. भावनिक निर्णयांना येथे थारा नाही – No Emotional Decision
  ८. अर्थसल्लागाराची मदत – Help of Financial Planner

हे घटक विस्तृतपणे समजाऊन घेऊ.

1) सध्याचे वय (Current Age) – सध्याचे वय म्हणजे नियोजनाच्या वेळी असलेले वय. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे . प्रत्येक वयासाठी आर्थिक नियोजन हे वेगळे असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आर्थिक नियोजनाचा सूर बदलतो.

2) आर्थिक उद्दीष्ट (Financial Goal) – वयानुसार प्रत्येकाचे आर्थिक उद्दिष्ट बदलते (काही-प्रमाणात बदलते). लघु मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट यांची पूर्ण यादी करा. आर्थिक उद्दिष्ट ठरवताना हे लक्षात असुद्या.

१. आर्थिक उद्दिष्ट ठरवताना त्यामध्ये वास्तविकता आणि स्पष्टता असावी.
२. उद्दिष्ट जितके वास्तविक तितके गाठणे सोपे असते.
३. उद्दिष्ठ ठरवताना किमान आपण स्वतःशी तरी प्रामाणिक असणे गरजेचे आहे.

उदा. मला श्रीमंत व्हायचंय म्हणजे नेमकं काय. कारण प्रत्येकाची श्रीमंत असण्याची व्याख्या वेगळी असू शकते. कुणाला 1 लाख म्हणजे श्रीमंत वाटेल तर कुणाला 1 कोटी. मुद्दा असा कि, उद्दिष्ट स्पष्ट असावे.

3) सद्य परिस्थीचा आढावा (Current Financial Position ) – याचा अर्थ सध्या आर्थिक स्थिती काय आहे याचा बारकाईने आणि सूक्ष्म रीतीने अभ्यास करणे. यात प्रामाणिकता असणे खूप गरजेचे आहे. कारण हाच आपला अर्थनियोजनाचा पाया आहे. उद्दिष्ट कसे गाठायचे आहे, हे यावरून स्पष्ट करता येते.

4) नियोजनाचा कालावधी (Term of Financial Planning) – आपण कोणते उद्दिष्ट गाठण्यासाठी किती वेळ देणार आहोत याची रीतसर मांडणी.

5) काटेकोरपणे अमलबजावणी (Implementation)- केलेल्या नियोजनाची काटेकोरपणे अमलबजावणी केलीं पाहिजे. धरसोड वृत्ती येथे चालत नाही. कोणतेही नियोजन काटेकोरपणाशिवाय तडीस जाऊ शकत नाही.

6) मूल्यमापन (Monitoring and Evaluation): ठरवलेल्या उद्दिष्टाचे वेळोवेळी मूल्यमापन करावे. स्थळ, काळ, वेळ आणि नियम यानुसार यात बदल होत जातात. त्याचे अवलोकन करावे. गरज पडल्यास नियोजनात योग्य तो बदल करावा. आपले उद्दिष्ट साध्य होत आहे ना, त्याकडे लक्ष असू द्यावे.

7) भावनिक निर्णयांना येथे थारा नाही (Emotional Decision without thinking of its affect)- आर्थिक नियोजन करताना कोणताही भावनिक निर्णय घेऊ नये. हा नियोजन विस्कळीत करणारा महत्वाचा घटक आहे. आपत्कालीन गरजांसाठी वेगळी तरतूद असावी.

8) अर्थसल्लागाराची मदत (Help of Finance Planner) – परिपूर्ण अर्थ नियोजनासाठी सातत्याने, यानिगडीत तांत्रिक बाबींचा अभ्यास असणे गरजेचे आहे. सर्वानाच हे काही शक्य होत नाही. त्यासाठी अर्थ सल्लागार Financial Planners/Consultants उपलब्ध असतात.

आता आर्थिक नियोजनातील संभाव्य चुका ही पाहूयात

आर्थिक नियोजनातील चुका:

१.  उद्दिष्ट स्पष्ट नसणे किवा त्यात वास्तविकता नसणे.
२.  परीणामाची गांभीर्यता लक्षात न घेता भावनिक निर्णय घेणे.
 ३. आर्थिक नियोजना चे वेळोवेळी मूल्यमापन न करणे
  ४. आर्थिक नियोजन हे फक्त निवृत्तीसाठी आहे हा गैरसमज असणे.
  ५. आर्थिक नियोजन हे फक्त श्रीमंत लोकांनीच करावे हा गैरसमज असणे.
  ६. कमी रकमेसाठी अर्थनियोजन उपयोगाचे नसते किंवा आपल्याकडे पुरेसे पैसे आले कि बघू अशी मानसिकता असणे).
  ७. पैश्यातील काही रक्कमेची बचत केली म्हणजे गुंतवणूक केली,हा गैरसमज असणे.
  ८. अवास्तव मिळकतीची अपेक्षा करणे.
  ९. आर्थिक नियोजनासाठी योग्य वेळेची वाट बघणे ,त्यात उशीर /चालढकल करणे.
१०. आर्थिक नियोजनासाठी योग्य सल्लागाराची मदत न घेणे.

आर्थिक नियोजनातील महत्वाच्या घटकांचा योग्य, वास्तविक विचार करून आणि संभाव्य चूका टाळून  केलेले नियोजन नक्कीच लाभदायी, मानसिक समाधान देणारे ठरते. आणि असे नियोजन S.E.B.I. रजिस्टर अर्थसल्लागाराची मदत घेउन करणेच श्रेयस्कर !!


Ref: http://marathimoney.com/


स्थावर मालमत्तेचे नियोजन :भाग १ : श्री. रघुवीर अधिकारी




विशेष नोंद : ह्या लेखातील सर्व अनुभव हे सत्यघटने वर आधरित असून काल्पनिक नावे घेउन सादर केलेले आहेत.

ही कथा आहे श्री. करंदीकरांची ! श्री. करंदीकर हे केंद्र सरकारच्या, उच्यपदावरील नोकरीतून निवृत्त झालेले सनदी अधिकारी. त्यांचा एकुलता एक मुलगा, शिरीष हा उच्यविद्याविभूषित आणि अमेरिकेत नोकरी करून, आपल्या कुटुंबां बरोबर, कायमचा स्थाईक झालेला होता. आपल्या उमेदीच्या काळात श्री. करंदीकरांनी अनेक ठिकाणी, जागेत पैसे गुंतविले होते आणि शिवाय काही वाडीलोपार्जित जमीनही त्यांच्या नावे होती. परंतु कामाच्या दगदगीत आणि सुखसंपन्न आयुष्यात मश्गुल झालेल्या श्री. करंदीकरानी कधीही, आपल्या स्थावर संपतीची कागदपत्रे व्यवस्थित नोंद करुन ठेवली नाहीत. त्यांनी आयुष्यभर केवळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले आणि ती गोष्ट म्हणजे, भरपूर पैसा कमाविणे आणि तो विविध जागांमध्ये गुंतविणे. त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर, अचानकच त्यांच्या पत्नीस पार्किनसन्सची व्याधी उद्भवली.  तेव्हा आपल्या कामात गर्क असलेल्या शिरीषने, आई-वडीलांची व्यवस्था, पुण्यात लवासामधील आरोग्यकेंद्रात केली. आज पत्नीच्या आजारपणामुळे आणि शिरीषकडून, मुलगा म्हणून झालेल्या अपेक्षाभंगामुळे श्री. करंदीकर, मानसिक रित्या संपूर्णतः कोलमडून गेले आहेत. पुढील आयुष्य काढण्यासाठी त्यांच्या जवळ, जरी पुरेशी संपती असली, तरीही त्यांना, पुढे त्यांच्या अनुपस्थित/पश्चात पत्नीची काळजी आरोग्यकेंद्राच्या वतीनेच घेतली जावी असे वाटते. या उदेश्यपुर्तीसाठी, त्यांना आपली स्थावर मालमत्ता, त्या आरोग्यकेंद्राला दान करावयची आहे. परंतु झालेले मानसिक खच्चीकरण, आर्थिक कागदपत्रे व्यवस्थीत न करवून घेणे/सांभाळणे ह्यामुळे, आज त्यांच्या हे देखील स्मरणात नाही की त्यांनी नेमक्या किती ठिकाणी आणि कोणत्या जागेचे, खरेदीचे व्यवहार केलेले आहेत.

ही सर्व कथा समजुन घेतल्यानंतर, एक आर्थिक सल्लागार म्हणून, माझ्यापुढे पुढील प्रश्न उभे राहिले.

१)      एक उच्यपदस्थ, सुशिक्षित व्यक्ती असूनही श्री. करंदीकरांनी, आपल्या स्थावर संपतीची कागदपत्रे व्यवस्थित नोंद करुन का ठेवली नाहीत ? आज त्यांच्या विस्मरणामुळे अथवा कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे, जर त्यांची स्वतःची मालकीची जागा असूनही, त्यांना ती उपयोगात आणता येणार नसेल तर, त्यांच्या कष्टाने कमाविलेल्या संपतीच्या नुकसाना करिता जबाबदार कोण? 

२)      आपल्या स्वतःच्या आयष्यात व्यग्र असणाऱ्या आणि वैयक्तीकरित्या सुख संपन्न असणाऱ्या शिरीषने, भारतात येऊन, त्या स्थावर मालमत्तेवर हक्क सांगितला नाही तर, ती कष्टार्जित संपती अतिक्रमित होण्याची किंवा इतर कोणाकडून बळकावली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, उच्यविद्याविभूषित व्यक्तीस (शिरीष आणि श्री. करंदीकर दोघेही) आर्थिक साक्षर म्हणावे का?

वरील अनुभवावरून हेच उधृत होते की केवळ स्थावर संपती “असणे” आणि ती खरोखरीच आपल्या प्रियजनांसाठी/ इतर उद्देश्याकरिता “सुरक्षित असणे” हा मुलभूत फरक जी व्यक्ती ओळखू शकते, त्याच व्यक्तीस आर्थिक साक्षर म्हणावयास हवे.

तेव्हा आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दल किंवा स्थावर मालमत्तेच्या असण्याबाबत भ्रामक कल्पना घेउन जगण्यापेक्षा, चला आर्थिक साक्षर होऊयात!! आपल्या आर्थिक व्यवव्हारांशी निगडीत, सर्वच कागदपत्रांची आवश्यक ती काळजी घेऊन आपल्या कुटुंबांवर “सजग प्रेम” करूयात !!
-    श्री. रघुवीर अधिकारी,
सि.ई.ओ.,
SWSFSPL.
अनुभव शब्दांकन: सौ. रुपाली कुलकर्णी


स्थावर मालमत्तेचे नियोजन: भाग २: श्री. रघुवीर अधिकारी

विशेष नोंद : ह्या लेखातील सर्व अनुभव हे सत्यघटने वर आधरित असून काल्पनिक नावे घेउन सादर केलेले आहेत.
एक आर्थिक सल्लागार म्हणुनही मला असे वाटते की आपण प्रत्येकानेच आपले “कुटूम्बावारील प्रेम” ह्या संकल्पनेचा सर्वच दृष्टीकोनातून विचार करावयास हवा. आपला सहवास, अन्न, वस्त्र, निवारा आपल्या कुटुंबियांना देणे आणि या भौतिक गरजा पूर्ण करने म्हणजे कुटुम्बा वरील प्रेम व्यक्त करने असते का ? वरकरणी जरी याचे उत्तर “हो” असे दिसत असले तरी हे परिपूर्ण उत्तर नव्हे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुलभुत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी घेणार्या प्रेमाला आपणप्रेमच म्हाणुयात.  परन्तु ह्या मुलभुत गरजान प्रमाणेच “सर्वकालीन आर्थिक सुरक्षा” ही देखील मूलभूत गरज च नव्हे का?  कुटुंब प्रमुखा च्या उप्स्थितींत जसे कुटुंबातील सदस्याना सुरक्षित वाटते तसेच त्याच्या / तिच्या अनुपस्थित देखील वाटले पाहिजे. अशी काळजी जे कुटुंब प्रमुख आपल्या कुटुम्बाच्या बाबतीत घेतात ते आणि केवळ तेच कुटुम्बा वर सर्वार्थाने “सजग प्रेम” करतात असे म्हणटलयास वावगे ठरू नये. ह्या “सजग प्रेम” संकल्पनेचा बोध होण्यासाठी माझा पुढे मांडलेला अनुभव आपल्याला मदत करू शकेल.

कथा १ : ही कथा आहे जाई ची ह्या अनुभवात आहे जाई !! मुंबईकर दाम्पत्याच्या जीवनात जाई च्या जन्मानंतर आनंदाची बहार आली. परन्तु जाई काही महिन्यांची असतानांच, तिच्या पालकांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. तेव्हा लहानग्या जाईची जबाबदारी तिच्या वयस्कर असणार्या कुसूम आत्यांनी घेतली. परन्तु दुर्दैवाचे चक्र अजुनही थांबले नव्हते. जाई वर्षाची होण्याच्या आतच, तीच्या एकंदरीत प्रगतीवारून ती एक गतिमंद बालिका असल्याचे आत्यांच्या लक्षात आले. तरीही, जाई च्या पालकांच्या रोख राहिलेल्या मिळकती मधून त्या जाई चा मायेने संभाळ करीत राहिल्या. जाई ८ वर्षांची होईपर्यंत हे सर्व व्यवस्थीत चालू राहिले. पुढे कुसुम आत्यांच्या आर्थिक अडचणी आणि वयोमानानुसार आलेली आजारपने,  ह्यामुळे जाई ला नासिक येथे गतिमंद मुलींच्या वसतीगृहात पठ्विन्यत आले. आत्याधुनिक सुविधा, मायेने साम्भाल करणार्या ताई आणि समवयस्क मैत्रिणी हयात जाई रमली. परन्तु लवकरच वस्तीगृहाचा मासिक खर्च कुसूम आत्याना पेल्वेनासा झाला. आजच्या मितीस, जाई च्या पालकांचे राहते घर असलेली सदनीका, पुनर्विकासा साठी पाडण्यात आलेली आहे. जाई अजुनही सद्न्यान नसल्या कारणामुळे, ही जागा तिच्या वडीलांच्या च नावे आहे. जागेचा पुनर्विकास करणारा बिल्डर हा भला माणुस असल्याकारणाने, तो आज वसतीगृहाचा मासिक खर्च देतो आहे.

ही सर्व कथा समजुन घेतल्यानंतर, एक आर्थिक सल्लागार म्हणून माझ्यापुढे साहजीकच पुढील प्रश्न उभे राहिले.

१)       जागेचा पुनर्विकास करणारा बिल्डर हा किती काळ वसतीगृहाचा मासिक खर्च देणार आहे? उद्या त्याची बुदधी फिरली तर जाई च्या वारसाह्क्क्काची जागा तिला मिळेल का्य? 

२)       कुसूम आत्यांचे काही बरे वाईट झाल्यास, जाई च्या वारसाह्क्क्काची जागा तिला कोण मिळवून देणार? तसेच त्या जागेचे विकसित मूल्य कोण ठरविणार जेणेकरुण जाई चा आजीवन खर्च वसतीगृह उचलू शकेल ?

३)       वारस म्हणून जाई च्या नावाने मालमत्तेचे नियोजन करने हे तीच्या पालकांचे कर्तव्य नव्हते का?

ह्या आणि अशा बऱ्याच अनुभवान वरुन असे लक्षात येते की कुटुम्बात नवीन सदस्य’ आल्यावर किंवा कुटुम्बातील कोणी सदस्य जान्यापूर्वी त्या व्यक्ती शी निगडीत (संदर्भातील) विविध स्थावर आणि इतर आर्थिक मालमत्तेचे कागदोपत्री पुनार्वोलोकन करुन लगोलग आवश्यक असे बदल करने निकडीचे असते. ही शब्दशः तातडीने करावयाची बाब आहे.

जर जाई च्या पालकांनी वेळेच त्यांच्या जागेच्या बाबतीत योग्य अशी पावले उचलली असती तर आज वयस्कर’ कुसूम आत्यान वर, त्यांची स्वतः ची आर्थिक अड़चन आणि आरोग्याची हेळसांड चालू असताना,  जाई साठी न्यायालयाच्या पायर्या चढ़न्याची वेळ आली नसती. जाई च्या कथे वरुन हेच सुस्पष्ट होते की जर जाई च्या पालकांनी, तिच्या बाबतीत “सजग प्रेम” दाखविले असते तर तीच्या भविष्याची नामुष्की ओढवीली नसती.

या कथेचा सारांश असा की आपण बहुतांश जण आपल्या स्वतःच्या आयुष्या बद्दल अगदी भ्रामक कल्पना घेउन जगत असतो. उदारणार्थ: मी पूर्णपणे सुध्रुढ आहे, इतक्यात मला काही होत नाही, मी हुशारीने माझ्या कुटुंबा साठी अगदी सगळी सोय करुन ठेवलेली आहे, वगैरे वगैरे. परन्तु  क्षणभंगूर आयुष्याला गृहीत धरणे म्हणजे स्वतःची आणि कुटुम्बा ची फसगत करने ठरु शकते आणि आपल्या मालमत्ते च्या कागदपत्रांच्या बाबतीत अगदी लहानशा ठिकाणी झालेले दुर्लक्ष ही , आपल्याच प्रियजणांना पुढे त्रासदायक ठरु शकते.
वरील सर्व विवेचना वरून तुम्हीच ठरवा की तुम्ही तुमच्या कुटुम्बा वर केवळ प्रेम करता की “सजग प्रेम” करता ? जर तुम्ही “सजग प्रेम” करीत असलात किंवा तुम्हाला तसे सजग रहाण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी निगडीत सर्वच आर्थिक व्यवहारनशी संबधीत कागदपत्रे पुन्हा एकदा आर्थिक सल्लागारा मार्फत पडताळून घेतली पाहिजेत आणि आवश्यक ते महत्वपूर्ण असे बदल तात्काळ करुन घेतले पाहिजेत. आर्थिक साक्षर असणारी व्यक्ती वरील कथेवरुन नक्कीच धडा घेईन आणि आवश्यक ती पावले तातडीने उचलेल ह्यात शंका नाही.
-    श्री. रघुवीर अधिकारी
सीईओ, SWSFSPL
अनुभव शब्दांकन: सौ. रुपाली कुलकर्णी