विशेष नोंद : ह्या लेखातील सर्व अनुभव हे सत्यघटने वर आधरित
असून काल्पनिक नावे घेउन सादर केलेले आहेत.
एक आर्थिक सल्लागार म्हणुनही मला असे वाटते की आपण प्रत्येकानेच आपले
“कुटूम्बावारील प्रेम” ह्या संकल्पनेचा सर्वच दृष्टीकोनातून विचार करावयास हवा.
आपला सहवास, अन्न, वस्त्र, निवारा आपल्या
कुटुंबियांना देणे आणि या भौतिक गरजा पूर्ण करने म्हणजे कुटुम्बा वरील प्रेम
व्यक्त करने असते का ? वरकरणी जरी
याचे उत्तर “हो” असे दिसत असले तरी हे परिपूर्ण उत्तर नव्हे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या
मुलभुत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी घेणार्या प्रेमाला आपण “प्रेम” च
म्हाणुयात. परन्तु ह्या मुलभुत गरजान
प्रमाणेच “सर्वकालीन आर्थिक सुरक्षा” ही देखील मूलभूत गरज च नव्हे का? कुटुंब प्रमुखा
च्या उप्स्थितींत जसे कुटुंबातील सदस्याना सुरक्षित वाटते तसेच त्याच्या / तिच्या
अनुपस्थित देखील वाटले पाहिजे. अशी काळजी जे कुटुंब प्रमुख आपल्या कुटुम्बाच्या
बाबतीत घेतात ते आणि केवळ तेच कुटुम्बा वर सर्वार्थाने “सजग प्रेम” करतात असे
म्हणटलयास वावगे ठरू नये. ह्या “सजग
प्रेम” संकल्पनेचा बोध होण्यासाठी माझा पुढे मांडलेला
अनुभव आपल्याला मदत करू शकेल.
कथा १ : ही कथा आहे जाई ची ह्या अनुभवात आहे जाई !! मुंबईकर दाम्पत्याच्या जीवनात जाई च्या जन्मानंतर
आनंदाची बहार आली. परन्तु जाई काही महिन्यांची असतानांच, तिच्या
पालकांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. तेव्हा लहानग्या जाईची जबाबदारी तिच्या
वयस्कर असणार्या कुसूम आत्यांनी घेतली. परन्तु दुर्दैवाचे चक्र अजुनही थांबले
नव्हते. जाई वर्षाची होण्याच्या आतच, तीच्या एकंदरीत
प्रगतीवारून ती एक गतिमंद बालिका असल्याचे आत्यांच्या लक्षात आले. तरीही, जाई च्या पालकांच्या रोख राहिलेल्या मिळकती मधून त्या जाई
चा मायेने संभाळ करीत राहिल्या. जाई ८ वर्षांची होईपर्यंत हे सर्व व्यवस्थीत चालू
राहिले. पुढे कुसुम आत्यांच्या आर्थिक अडचणी आणि वयोमानानुसार आलेली आजारपने, ह्यामुळे जाई ला नासिक येथे गतिमंद
मुलींच्या वसतीगृहात पठ्विन्यत आले. आत्याधुनिक सुविधा, मायेने साम्भाल करणार्या ताई आणि समवयस्क मैत्रिणी हयात जाई
रमली. परन्तु लवकरच वस्तीगृहाचा मासिक खर्च कुसूम आत्याना पेल्वेनासा झाला. आजच्या
मितीस, जाई च्या
पालकांचे राहते घर असलेली सदनीका, पुनर्विकासा
साठी पाडण्यात आलेली आहे. जाई अजुनही सद्न्यान नसल्या कारणामुळे, ही जागा तिच्या वडीलांच्या च नावे आहे. जागेचा पुनर्विकास
करणारा बिल्डर हा भला माणुस असल्याकारणाने, तो आज वसतीगृहाचा मासिक खर्च देतो आहे.
ही सर्व कथा समजुन घेतल्यानंतर, एक आर्थिक सल्लागार म्हणून माझ्यापुढे साहजीकच पुढील प्रश्न
उभे राहिले.
१)
जागेचा
पुनर्विकास करणारा बिल्डर हा किती काळ वसतीगृहाचा मासिक खर्च देणार आहे? उद्या त्याची बुदधी फिरली तर जाई च्या वारसाह्क्क्काची जागा
तिला मिळेल का्य?
२)
कुसूम आत्यांचे
काही बरे वाईट झाल्यास, जाई च्या
वारसाह्क्क्काची जागा तिला कोण मिळवून देणार? तसेच त्या जागेचे विकसित मूल्य कोण ठरविणार जेणेकरुण जाई चा आजीवन खर्च
वसतीगृह उचलू शकेल ?
३)
वारस म्हणून
जाई च्या नावाने मालमत्तेचे नियोजन करने हे तीच्या पालकांचे कर्तव्य नव्हते का?
ह्या आणि अशा बऱ्याच अनुभवान वरुन असे लक्षात येते की कुटुम्बात नवीन
सदस्य’ आल्यावर किंवा कुटुम्बातील कोणी सदस्य जान्यापूर्वी त्या व्यक्ती शी निगडीत
(संदर्भातील) विविध स्थावर आणि इतर आर्थिक मालमत्तेचे कागदोपत्री पुनार्वोलोकन
करुन लगोलग आवश्यक असे बदल करने निकडीचे असते. ही शब्दशः तातडीने करावयाची बाब
आहे.
जर जाई च्या पालकांनी वेळेच त्यांच्या जागेच्या बाबतीत योग्य अशी पावले उचलली असती तर आज
वयस्कर’ कुसूम आत्यान वर, त्यांची स्वतः
ची आर्थिक अड़चन आणि आरोग्याची हेळसांड चालू असताना, जाई साठी
न्यायालयाच्या पायर्या चढ़न्याची वेळ आली नसती. जाई च्या कथे वरुन हेच सुस्पष्ट
होते की जर जाई च्या पालकांनी, तिच्या बाबतीत
“सजग प्रेम” दाखविले असते तर तीच्या भविष्याची नामुष्की ओढवीली नसती.
या कथेचा सारांश असा की आपण बहुतांश जण आपल्या स्वतःच्या
आयुष्या बद्दल अगदी भ्रामक कल्पना घेउन जगत असतो. उदारणार्थ: मी पूर्णपणे सुध्रुढ
आहे, इतक्यात मला
काही होत नाही, मी हुशारीने
माझ्या कुटुंबा साठी अगदी सगळी सोय करुन ठेवलेली आहे, वगैरे वगैरे. परन्तु
क्षणभंगूर आयुष्याला गृहीत धरणे म्हणजे स्वतःची आणि कुटुम्बा ची फसगत करने
ठरु शकते आणि आपल्या मालमत्ते च्या कागदपत्रांच्या बाबतीत अगदी लहानशा ठिकाणी
झालेले दुर्लक्ष ही , आपल्याच
प्रियजणांना पुढे त्रासदायक ठरु शकते.
वरील सर्व विवेचना वरून तुम्हीच ठरवा की तुम्ही तुमच्या
कुटुम्बा वर केवळ प्रेम करता की “सजग प्रेम” करता ? जर तुम्ही “सजग प्रेम” करीत असलात किंवा तुम्हाला तसे सजग
रहाण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी निगडीत सर्वच आर्थिक
व्यवहारनशी संबधीत कागदपत्रे पुन्हा एकदा आर्थिक सल्लागारा मार्फत पडताळून घेतली
पाहिजेत आणि आवश्यक ते महत्वपूर्ण असे बदल तात्काळ करुन घेतले पाहिजेत. आर्थिक
साक्षर असणारी व्यक्ती वरील कथेवरुन नक्कीच धडा घेईन आणि आवश्यक ती पावले तातडीने
उचलेल ह्यात शंका नाही.
- श्री. रघुवीर अधिकारी
सीईओ, SWSFSPL
अनुभव
शब्दांकन: सौ. रुपाली कुलकर्णी