Tuesday, November 20, 2018

मनो-Money : भाग १ : प्लानिंग पॉकेटमनीचे : डॉ. रुपाली कुलकर्णी



Hello बालदोस्तांनो, मी तुमची रुपाली ताई! आता वयम मधून, तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी भेटणार आहे बर का!! बरे, आजचा आपला गप्पांचा विषय पण एकदम तुमच्या आवडीचा आहे. कोणता? अरे....पॉकेटमनी !! मला खात्री आहे की आई-बाबा, आजी-आजोबा तुम्हाला खाऊचे पैसे नक्कीच देत असणार आणि तेही डोळसपणेच. हो, आम्ही त्याला खाऊचे पैसे म्हणायचो, तुम्ही मात्र त्याला स्मार्ट शब्द वापरता, पॉकेटमनी!! मला सांगा, हा पॉकेटमनी, खरोखरच पॉकेट मध्ये रहातो का की कितीही नाही म्हंटले तरी खर्चच होऊन जातो? तुम्ही म्हणाल, “छट ! पॉकेटमनी कधी साठवून ठेवायचा असतो का? तो तर देतातच आम्हाला खर्च करण्यासाठी. कधी खाऊ, कधी खेळणी तर कधी पिक्चर ला जाण्यासाठी, आम्ही तो खर्चून टाकतो.” पण तुमच्यातलेच काही बालदोस्त नक्कीच असेही असणार, जे आपल्या, पुढील काही  गम्माडीजमतीसाठी पॉकेटमनी साठवून ठेवत असतील. म्हणजेच पॉकेटमनी चे प्लानिंग करत असतील. तर हे प्लानिंग प्रभावीपणे कसे करता येईल, ते आपण बघू.

       मग, आपली तर सगळी स्मार्ट gang आहे ना!! तर चला, पॉकेटमनी चे प्लानिंगही आपण स्मार्टपणे करूयात. तर ह्या SMART शब्दाला आपण जरा असे वाचूयात: S-Specific, M-Measurable, A:Achievable, R: Realistic आणि T:Time-bound. म्हणजेच जी काही गम्माडीजम्मत आपल्याला भविष्यात घ्यायची आहे ना, ती नक्की काय आहे (Specific), किती किमतीची आणि संख्येने किती घेणे आहे (Measurable), जवळ असणाऱ्या पॉकेटमनीतून ती नक्की घेता येणार आहे का (Achievable), ती वास्तववादी अथवा घेण्यासारखी आहे का (Realistic) आणि ती नक्की केव्हा विकत घ्यायची आहे (Time-bound). हे सगळे मुद्दे आपल्या प्लानिंगमध्ये आलेच पाहिजे. आता उदाहरणार्थ, आपण राधा आणि स्वराज या दोघांनी केलेले पॉकेटमनी चे प्लानिंग बघूयात. समजा या दोघांनाही टेबलटेनिस खेळण्याची आवड आहे आणि आपल्या पॉकेटमनीतून, इतर काही गोष्टींबरोबरच त्यांना टेबलटेनिस ची रॅकेट विकत घायची आहे. आता ह्या दोघांनी केलेले प्लानिंग पहा.


SMART
राधा
स्वराज
Specific
मला पॉकेटमनी तून रॅकेट घायची आहे.
मला पॉकेटमनी तून बिगिनर्स ची रॅकेट  घायची आहे.
Measurable
मला पॉकेटमनीतून काही पैसे लागतील
मला त्यासाठी एकूण १००० रु. ची आवश्यकता आहे
Achievable
मला स्वतःला च सगळे पैसे जमवावे लागतील. जमेल का मला?
कधी जर मला कमी पॉकेटमनी मिळाला, तर अधिक लागणारी रक्कम बाबांकडे मागीन.
Realistic
मला रॅकेट कोणीतरी गिफ्ट देईल
मला मिळणारा पॉकेटमनी, रॅकेट घेण्यास नक्कीच पुरेसा आहे.
Time-bound
बघू, कधीतरी पॉकेटमनीतून पैसे बाजूस ठेवू.
मी त्यासाठी पॉकेटमनीतून १० महिने, १०० रु.बाजूस ठेवणार आहे.
 मग, कोणाचे प्लांनिंग तुम्हाला बरोबर वाटते ? कोण ठरविल्या प्रमाणे, टेबलटेनिस ची रॅकेट वेळेवर घेऊन शकेन? नक्कीच स्वराज ने आपला SMART फॉर्म्युला वापरून, अधिक प्रभावी प्लानिंग केले आहे आणि त्याला स्वतःच्याच प्लांनिंग आणि  पॉकेटमनीतून रॅकेट खरेदी करण्याचा आनंद मिळणार आहे.


मग बालदोस्तांनो, पटला का माझा फंडा ? तुम्ही काय, होच म्हणाल !! मला कसे समजणार की तुम्हाला नक्की काय आणि किती उमगलाय हा SMART फॉर्म्युला? तर मग, https://goo.gl/8WiqzW ह्या लिंक वर जा आणि तिकडे हा फॉर्म्युला वापरून दाखवा बरे ! काही अडचण आलीच, तर मला बिनधास्त खालील नंबरवर फोन करा. वाट बघतेय ह्न..तुमच्या प्रतिसादाची!! आणि हो, आई-बाबांकडे पॉकेटमनी मागू मात्र नका ह्न..ते तर देतील तुम्हाला आवश्यकता असेल तर!  भेटूच पुन्हा लवकर..... बाय फॉर नाऊ ....तुमची रुपाली ताई !!
-