Hello बालदोस्तांनो, मागील महिन्यामध्ये आपण “चक्रवाढ व्याज” ह्या
संकल्पनेला गोष्टीरूपातून समजावून घेतले. आता ह्या संकल्पनेला अजून विस्तृतपणे समजावून घेऊयात.
तुम्ही अमेरिकन नागरिक, वॉरेन बफे
यांच्याबद्दल ऐकले आहे का ?
त्यांना गुंतवणूक जगतातील गुरु मानले जाते. त्यांनी वयाच्या ११व्या वर्षी शेअर
बाजारातून,
आपला पहिला शेअर विकत घेतला होता आणि आज जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये
त्यांचा तिसरा क्रमांक आहे !! म्हणजेच काय,
आपल्या आर्थिक श्रीमंतीसाठी,
आपण पहिले पाऊल जितक्या लवकर उचलू तितके चांगले !! म्हणजेच फॉर्म्युला झाला Sooner The Better !!
चला आता हे उदाहरणा द्वारे समजावून घेऊयात.
राधा
आणि सारा या दोन्ही बालमैत्रीणींना पॉकेटमनी मिळायचा. राधाने वयाच्या १० व्या
वर्षा पासूनच बचत करण्याचे ठरविले. तिने बँकेमध्ये, दरवर्षी १०० रु, ८% व्याजदराने बचत करण्यास सुरुवात केली. तिने
तेव्हाच सारालाही बचत करण्यासाठी सुचविले. परंतु सारा आपला पोकेटमनी नेहेमीच पूर्णपणे
खर्च करून टाकत असे. पुढे कालौघात,
साराला देखील राधाचे म्हणणे पटले आणि तिने १६ व्या वयवर्षापासून पुढे, दरवर्षी, त्याच
व्याजदराने, तेवढ्याच
रक्कमेची बचत करण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी राधाने मात्र,
बँकेमधील आपली बचत थांबविली होती. त्या दोघींची बँकेमधील बचत, चक्रवाढ
व्याज पद्धतीमध्ये कशी वाढत गेली, हे
सगळे खालील टेबल मध्ये मांडले आहे.
वय
|
राधाची बचत
|
साराची
बचत
|
||
१०
|
१००+ व्याज
|
१०८
|
०
|
|
११
|
१००+१०८ + व्याज
|
२२५
|
०
|
|
१२
|
१००+२२५ + व्याज
|
३५१
|
०
|
|
१३
|
१००+३५१ +व्याज
|
४८७
|
०
|
|
१४
|
१००+४८७ + व्याज
|
६३४
|
०
|
|
१५
|
१००+६३४ + व्याज
|
७९२
|
०
|
|
१६
|
०+ ७९२ + व्याज
|
८५५
|
१००
|
१०८
|
१७
|
०+८५५+ व्याज
|
९२३
|
१००+१०८+व्याज
|
२२५
|
१८
|
०+९२३+ व्याज
|
९९७
|
१००+२२५+व्याज
|
३५१
|
याप्रमाणे पुढे २५ वर्षांपर्यंत
|
याप्रमाणे पुढे २५ वर्षांपर्यंत
|
|||
२५
|
१७१०
|
१५६५
|
||
एकूण कालावधी ६ वर्षे, एकूण बचत ६०० रु.
एकूण परतावा १७१० रु. !!
|
एकूण कालावधी १० वर्षे, एकूण बचत १००० रु.
एकूण परतावा १५६५ रु.
|
जेव्हा
वयाच्या २५व्या वर्षी, या
दोघींनी आपल्या बचतीची तुलना केली,
तेव्हा काय लक्षात आले? राधाने,
जास्त काळ-जास्त बचत करणाऱ्या साराला, कमी काळ-कमी बचत करूनही,
एकूण परताव्याच्या बाबतीत मागेच टाकले. राधाने बचतीची लवकर सुरुवात केल्यामुळे, चक्रवाढ
व्याज पद्धतीचा फायदा, तिला
लवकर मिळण्यास सुरुवात झाली ! त्यामुळे Sooner The Better फॉर्म्युला
प्रमाणे,
राधा बचतीत सरस ठरली !! हा झाला, चक्रवाढ
व्याजाचा महिमा !! आहे न भारी ?
दोस्तानो, गुंतवणुकीची सुरुवात लवकर करणाऱ्या वॉरेन बफे यांच्याकडे, आज इतकी संपत्ती जमा आहे
की त्यांना गुंतवणुकीची साधने अक्षरशः कमी पडताहेत !! अर्थात हे सगळे झाले आर्थिक
श्रीमंती विषयी ! बाकी आपली मोजता न येणारी वैचारिक, समाजिक, नात्यांमधील श्रीमंतीही अतिशय महत्वाची आहे बर का !!
बघा मग, विचार करा !! कदाचित वॉरेन बफे यांचे पुढचे भारतीय वर्जन, तुम्हीच तर नाही ? भेटूच पुन्हा....तुमची
रुपाली ताई !!