Friday, January 22, 2021

मनो-Money: भाग २४ : पैसे ! ते ही Liquid ? -डॉ. रुपाली कुलकर्णी



आज तक्रारीचा  सूर लावतराधा आई-बाबां कडे येते.

राधा: आईबघ ना ग ! मला फक्त १०० रु. हवे आहेतमैत्रिणीच्या वाढदिवसाचे गिफ्ट आणायला. तर बाबा म्हणाले की , "तुला आता पॉकेटमनी सोबतस्कॉलरशिपही  मिळते नामग आजोबां बरोबर  जा आणि बँकेतून काढून घे !". हे ग काय आईफक्त १०० रु. साठी मला आणि आजोबांना बाहेर जावे लागेल ना !

आई: राधाखरंच की ! आत्ताची तुझी गरज तर खूपच लहान आहे. पण  ज्या अर्थी बाबांनी तुला हे सांगितले त्या अर्थी त्यांच्या हेतूमागे नक्कीच काहीतरी चांगले दडले असणार ! विचार की बाबांना !

राधा: बाबाचला सांगा आता तरी ! का मला असे बाहेर जायला लावता ?

बाबा (हसून): राधातुझी चिडचिड होतेय खरी पण जरा विचार कर ना की तुझ्या बँक अकाउंटमध्ये हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम असतानातुझ्यावर पुन्हा आमच्याकडे पैसे मागायची वेळ का आलीय या प्रसंगातून काय शिकायचे हे समजावून घेऊयात.  

राधा: ठीके बाबा. माझ्या चांगल्यासाठी आहेतर मी राग बाजूला ठेवून ऐकते !

बाबा: राधा, "Liquidity of Money" ही संज्ञा समजावून घे ! समजा माझ्याकडे ५ लाख रु. इतक्या किंमतीची जमीन आहे आणि मला आज तत्काळ फक्त  २०,००० रु. ची गरज आहे तेव्हा मला त्या जमिनीचा एक छोटासा तुकडा लगेच विकून ही गरज भागवता येईल का ?

राधा: बाबाइतक्या लहान गरजेसाठी कोणी आपली मौल्यवान जमीन का विकतील आणि जरी अशी जमीन विक्रीस काढली तरी ती लगेच विकता येणार नाही.

आई : आणि जरी तो जमिनीचा तुकडातत्त्काळ विकला गेला तरी  असा "तुकडा-मोड" झाल्यानेभविष्यात उर्वरित भागाची विक्री करणे अवघड होईल ना !

बाबा: सगळी उत्तरे परफेक्ट ! राधायालाच म्हणतात   "Liquidity of Money" अर्थात "पैशांची तरलता किंवा उपलब्धता". आपण आपल्या  तत्काळ गरजेस उपलब्ध होऊ शकेल अशी रक्कम कायम  "इमर्जन्सी फंड" म्हणून Liquid अर्थात "लगेच उपलब्ध होईल" अशा ठिकाणी ठेवली पाहिजे. बँकेतबचत खात्यात ठेवलेली अशी रक्कम म्हणजेच Liquidable Money ! आपण गरज  भासताच,  बँकेत जाऊन, ATM चा वापर करून अशी रक्कम मिळवू शकतो.

राधा: पण बाबा,  आपल्याला थोडेच माहीत असते की भविष्यात काय गरज चालून येईल?

बाबा: बरोबर ! पणआपल्या घराचा दरमहा असणारा खर्चसंभाव्य आजारपणे याचा अंदाज आपल्याला असतोच ना. त्याचा  विचार करून आपण काही रक्कम ही बचत खात्यात कायमच ठेवलीच पाहिजे आणि मग उरलेले पैसे इतरत्र गुंतविलेले चांगले ! मग  इमर्जन्सीच्या वेळेतआपल्याला आपली गुंतवणुक  मोडावी लागत नाही.

आई: राधाबरेचदा असे पाहण्यात येते की  किरकोळ इमर्जन्सीच्या वेळेतलोक आपल्या मुदतठेवी किंवा इतरत्र केलेली मोठी गुंतवणुक मोडतात. मग अशा वेळेसजे आर्थिक ध्येय डोळ्यासमोर ठेवून ती गुंतवणुक केलेली होती तिच्यापासूनही अपेक्षित परतावा मिळत नाही आणि पर्यायाने कुटुंबाचे आर्थिक नियोजनही कोलमडते. म्हणूनच, Liquidable Money याकडे आर्थिक नियोजनाचा एक भाग म्हणून पाहणे आणि त्यानुसार तरदूत करणे महत्वाचे आहे.   

बाबा: साधारणपणे ठोकताळा असा लावता येईल की नोकरदार वर्गाने आपल्या सहा वेतनाइतका पैसा तरल ठेवला पाहिजे आणि व्यावसायिक वर्गाने त्यापेक्षाही अधिक !            

राधा: समजले बाबा ! पण  माझे  सगळे पैसे बँकेतबचत खात्यातच तर आहेत ना ?

बाबा: अग होपण  वरखर्चाला लागणारे पैसे तर  तुझ्या पर्समध्ये आता हवे होते ना त्याचा विचार न करता तू आलेले सगळेच पैसे बँकेत ठेवलेस.

राधा: खरंच की बाबा ! यापुढे मी काळजी घेईन. पण  आता आजच्या संध्याकाळ पुरते तुम्ही किंवा आईच माझे ATM ! चलो दे दोसॊ रुपये !        

 आई आणि बाबा राधाच्या या शाब्दिक कोटीवर हसून दाद देतात .          

-        डॉ. रुपाली कुलकर्णी,

-     ट्रेनिंग हेड

-   SWS Financial Solutions Pvt. Ltd.